esakal | ९५ वर्षीय आजोबांची इच्छाशक्ती बनली कुटुबीयांची प्रेरणा; इतरांसीठी ठरले आदर्श
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Sakal

सकारात्मक विचार आणि इच्छाशक्तीच्या जोरावर ९५ व्या वर्षीही महामारीविरोधात यशस्वी लढा देणारे किसन लहिरे हे आजोबा सध्या रुग्णांसमोर आदर्श ठरले आहेत.

९५ वर्षीय आजोबांची इच्छाशक्ती ठरली कुटुबीयांची प्रेरणा

sakal_logo
By
अमोल खरे

मनमाड (जि. नाशिक) : सकारात्मक विचार आणि इच्छाशक्तीच्या जोरावर ९५ व्या वर्षीही महामारीविरोधात यशस्वी लढा देणारे किसन लहिरे हे आजोबा सध्या रुग्णांसमोर आदर्श ठरले आहेत. ना रेमडेसिव्हिर ना भारी औषधोपचार केवळ स्वतःची प्रबळ इच्छाशक्ती आणि डॉक्टरांचा सल्ला यामुळे ते अगदी ठणठणीत बरे झाले आहेत. त्यामुळे पॉझिटिव्ह कुटुंब त्यांच्याकडे पाहून बरे झालेच, शिवाय इतरांनीही त्यांच्यापासून प्रेरणा मिळाली आहे. (95-year-old grandfather successfully defeated Corona In Manmad)

रेल्वेतून ३६ वर्षांपूर्वी निवृत्त झालेले मनमाडपासून जवळ असलेल्या कऱ्ही येथील किसन लक्ष्मण लहिरे यांचे सध्या कौतुक केले जात आहे. लहिरे यांना अशक्तपणा, ताप जाणवू लागल्यानंतर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोविड टेस्ट केली. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. एचआरसीटी करण्याचा सल्लाही देण्यात आला. पण मी अगदी ठीक आहे, घाबरू नका, असे सांगत त्यांनीच त्यांच्या कुटुंबीयांना आधार दिला. आजोबांचे वय जास्त असल्याने सर्वच लहिरे कुटुंबीय चिंतेत बुडाले होते. काही दिवसांतच अशोक लहिरे (मुलगा), मथुरा लहिरे (सून), संतोष लहिरे (नातू), मायावती लहिरे (नातसून) असे सर्वच लहिरे कुटुंबीय कोरोनाबाधित झाले. कुटुंबच पॉझिटिव्ह निघाल्याने सर्वांचाच धीर खचत होता. डॉक्टरांकडे उपचार सुरू होते. आजोबांनी सर्वांनाच धीर देत मी ९५ वर्षांचा असताना कोरोनापुढे खचलो नाही, तर तरणेबांड आहात घाबरू नका, मलाही काही होणार नाही आणि तुम्हालाही काही होणार नाही. काळजी घेऊ, डॉक्टरांचा सल्ला आणि दिलेली औषधे घ्या, पोटभर जेवण करा, असे सांगत कुटुंबीयांना आधार दिला. या महामारीतून सर्वच कुटुंब सहीसलामत बचावले. त्यांनी धीर ठेवत उपचार करून घेत कोरोनावर अखेर मात केली. डॉक्टरांनी सांगितलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन केले. प्रबळ इच्छाशक्तीमुळेच आपण कोरोनाला हरवू शकलो. माझ्या कुटुंबीयांची मोलाची साथ मिळाल्यानेच आपल्याला कोरोनावर यशस्वी मात करता आल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: लूट करणाऱ्यांना मोकळीक तर दाद मागणाऱ्यांवर गुन्हे - जितेंद्र भावेपॉझिटिव्ह निघालेल्या आमच्या वडिलांना आम्हीच धीर आधार द्यायला पाहिजे होता. परंतु आम्ही सर्वच कुटुंब पॉझिटिव्ह निघाल्याने आम्ही घाबरलो होतो. ग्रामीण भागात आधीच भीतीचे वातावरण होते. आमच्या वडिलांनीच आम्हा सर्व कुटुंबीयांना धीर दिला. कोरोनाशी दोन हात करण्याचे बळ दिल्यामुळे आम्ही कोरोनामुक्त होऊ शकलो.
-अशोक लहिरे, मुलगा, कऱ्ही

(95-year-old grandfather successfully defeated Corona In Manmad)