esakal | शिष्यवृत्तीच्या बहाण्याने पावणे तीन लाखाला पालकाला गंडविले
sakal

बोलून बातमी शोधा

शिष्यवृत्तीच्या बहाण्याने पावणे तीन लाखाला पालकाला गंडविले

पालकांनी लिंकवर सांगितल्यानुसार पैसे भरले. मात्र त्यानंतर भामट्यांनी संपर्क तोडल्याने फसवणूक झाल्याचे अनेकांच्या लक्षात आले.

शिष्यवृत्तीच्या बहाण्याने पावणे तीन लाखाला पालकाला गंडविले

sakal_logo
By
विनोद बेदरकर -सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शैक्षणिक शिष्यवृत्ती (scholarship) देण्याच्या बहाण्याने एकाने पालकाला तब्बल पावणे तीन लाखास गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. (A parent has been cheated in Nashik under the pretext of scholarship)

हेही वाचा: जिल्‍हा मुख्याध्यापक संघाचा २८ जूनपासून उपोषणाचा इशारा

कंपनीच्या माध्यमातून मुलांचा अभ्यासक्रम व स्कॉलरशिप मंजुर करुन देण्याचे आमिष दाखवून भामट्यांनी शहरातील पालकांना सुमारे पावने तीन लाख रुपयांना गंडा घातला. ही रक्कम प्रोसेसिंग फी च्या नावाखाली आॅनलाईन लांबविण्यात आली. पालकांनी लिंकवर सांगितल्यानुसार पैसे भरले. मात्र त्यानंतर भामट्यांनी संपर्क तोडल्याने फसवणूक झाल्याचे अनेकांच्या लक्षात आले.

हेही वाचा: नाशिक जिल्ह्यात निर्बंध होणार आणखी शिथील

याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविंद्र श्रीकृष्ण पांडे (रा.उत्तमनगर,सिडको) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात पांडे यांच्याशी भामट्यांनी संपर्क साधला होता. सर्व शिक्षण सोल्युशनच्या माध्यमातून तुमच्या मुलांना एल.एल.पी कंपनीकडून शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळणार असल्याचे सांगत भामट्यांने एका लिंकच्या आधारे प्रोसेसिंग फी च्या नावाखाली तब्बल २ लाख ७२ हजार ५०० रूपये आॅनलाईन भरण्यास भाग पाडले.

हेही वाचा: नाशिक बाजार समितीत आता स्मार्ट हेल्मेटद्वारे स्क्रीनिंग

वेगवेगळ्या मोबाईल नंबर वरून यासाठी संपर्क साधून बँक खात्यात हे पैसे वर्ग करण्यात आले. मुलांना शैक्षणिक खर्चासाठी लाखों रूपये मिळणार असल्याने पांडे यांनी ही रक्कम वर्ग केली. वर्ष भराचा कालावधी उलटूनही शिष्यवृत्ती न मिळाल्याने व आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने पांडे यांनी पोलिसात धाव घेतली वरिष्ठ निरीक्षक श्रीपाद परोपकारी करीत आहेत. (A parent has been cheated in Nashik under the pretext of scholarship)

loading image
go to top