पुरोगामी संघटना निवेदन

पुरोगामी संघटना निवेदन
Published on: 
धुळे : टुडे पान २ साठी... --- आधार प्रमाणीकरण नसलेले विद्यार्थी संचमान्यतेत ग्राह्य धरा पुरोगामी शिक्षक संघटनेची शासनाकडे निवेदनातून मागणी सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १४ : युडायस प्रणालीतील तांत्रिक अडचणींमुळे आधार प्रमाणीकरण न झालेल्या विद्यार्थ्यांना यंदाच्या २०२६-२७ च्या संचमान्यतेत ग्राह्य धरावे, अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेने शासनाकडे केली आहे. मागील वर्षी आधार प्रमाणीकरण नसलेल्या विद्यार्थ्यांना वगळल्यामुळे अनेक शाळांमधील विद्यार्थी संख्या कागदोपत्री कमी दाखवली गेली. परिणामी, अनेक शाळांची शिक्षक पदे कमी मंजूर झाली. विशेषतः पहिली आणि दुसरीच्या लहान बालकांच्या बोटांचे ठसे उमटण्यात येणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि नाव, जन्मतारखेतील किरकोळ तफावतीमुळे हे प्रमाणीकरण रखडते. हे विद्यार्थी नियमित शिक्षण घेत असून, त्यांना गणवेश, पाठ्यपुस्तके व पोषण आहारासारखे सर्व लाभ मिळत असताना संचमान्यतेत त्यांना डावलणे विद्यार्थ्यांवर अन्यायकारक आहे, असे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत अशा विद्यार्थ्यांची ऑफलाइन पडताळणी करून त्यांना ग्राह्य धरावे, अशी मागणी करण्यात आली. संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, सरचिटणीस हरीश ससनकर यांच्यासह मार्गदर्शनात शासनास या मागणीचे निवेदन देण्यात आल्याची माहिती संघटनेचे राज्य प्रमुख संघटक तथा जिल्हाध्यक्ष भूपेश वाघ, सरचिटणीस ऋषिकेश कापडे, कार्याध्यक्ष प्रशांत महाले, राज्य उपाध्यक्ष रवींद्र बोरसे, विभागीय अध्यक्ष रवींद्र सैंदाने, सचिव रवींद्र देवरे, महिला राज्य कोषाध्यक्षा रुखमा पाटील, महिला अध्यक्ष सुरेखा बोरसे, सरचिटणीस प्रतिभा वाघ यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.