शाळेंची मनमानी फी वसुली बंद करा; आम आदमी पार्टीची मागणी | Nashik News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

school fees

शाळेंची मनमानी फी वसुली बंद करा; आम आदमी पार्टीची मागणी

नाशिक : शहरात खासगी शाळेकडून मनमानी पद्धतीने फी वसुल होत असल्याने तातडीने हे सर्व प्रकार बंद करण्याच्या मागणीसाठी आम आदमी पार्टीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. याबाबत मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

हेही वाचा: शालाबाह्य बालकांच्या शोधासाठी येत्या ५ जुलैपासून खास मोहीम

निवेदनात म्हटले आहे, की शाळांची मनमानी फी वसुली विरोधात, तसेच दिल्ली सरकारप्रमाणे सरकारी शाळांच्या सोयीसुविधा, गुणवत्ता वाढविण्यासाठी करिता आम आदमी पक्षातर्फे विविध संघटना व पालकांकडून वेळोवेळी आंदोलन, निवेदन देण्यात आले. निवेदनानुसार काय कारवाई झाली, याबाबत शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या माध्यमातून कुठलीही माहिती मिळत नाही. परंतु, खासगी शाळांची मनमानी फी वसुली सुरूच आहे.

कोरोनाकाळातील ५० टक्के फी कपातीबाबत पालकांनी निवेदन देऊनदेखील निर्णय झालेला नाही. त्यामुळे यावर प्रशासनाने ठोस कारवाई करावी. खासगी शाळांनी कोरोनाकाळातील ५० टक्के फी कपात करावी, यासाठी लेखापरीक्षण करण्याचे आदेश द्यावे. सरकारी शाळांच्या सोयी सुविधा, तसेच गुणवत्ता वाढीकरिता दिल्ली सरकारप्रमाणे उपाययोजना करण्यात याव्यात. मागील ३ वर्षाचे लेखापरीक्षण करून बेकायदेशीर वसूल केलेली फी पालकांना परत करावी. मनमानी फी वर नियंत्रण आणावे. खासगी शाळांवर प्रशासक नेमण्यात यावेत. मागण्या लवकर पूर्ण न झाल्यास आम आदमी पक्षातर्फे तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारादेखील देण्यात आला.

हेही वाचा: पालकांच्या ‘अति काळजी’चा शिक्षकांवर भडिमार

Web Title: Aam Aadmi Party Agitation And A Statement To Increase The Facilities And Quality Of Government Schools Like Delhi Government Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top