
Nashik News : व्याजाने घेतलेल्या पैशाची परतफेड केली नाही म्हणून नेले पळवून
Nashik Crime News : युवकाने व्याजाने घेतलेल्या पैशाची परतफेड केली नाही म्हणून पळवून नेत त्याच्याकडे वीस लाखांची मागणी केल्याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर पाटील व यशवंत बागूल यांच्याविरुध्द हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रमिला जगन्नाथ पाटील (आनंद प्रेमशिल्प अपार्टमेंट, बोधले नगर) यांचा मुलगा संदीप हा स्विगीची डिलिव्हरीचे काम करतो. शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास संदीप नाशिक रोड परिसरात डिलिव्हरीसाठी दुचाकीवर गेला होता. (Abducted because he did not repay money borrowed with interest Nashik Crime News)
हेही वाचा : ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...
संदीपने आईला फोन करून सांगितले की, वीस लाख रुपये जमा करून ठेव, हे लोक प्रॉपर्टी नावावर करून मागत आहेत. मला घेऊन चालले आहेत, असे सांगून संदीपने फोन बंद केला.
२०२१ मध्ये संदीप हा जमीन खरेदी विक्रीचे काम करत असताना काही जणांकडून त्याने व्याजाने पैसे घेतले होते. त्याची परतफेड केली नाही म्हणून ते त्याला ज्ञानेश्वर पाटील व यशवंत बागूल यांनी पळवून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.