धुळे : टुडे पान २ साठी.. मेन
---
फोटो- 32672, 32673, 32773
धुळे : पिंपळादेवी विद्यालयात माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जयंतीनिमित्त अभिवादनप्रसंगी उपस्थित शिक्षक, विद्यार्थी. दुसऱ्या छायाचित्रात अभय माध्यमिक विद्यालयात पुस्तक वाचन करताना विद्यार्थी. शेवटच्या छायाचित्रात दोंडाईचात हस्ती पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वाचनाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी शाळेच्या मैदानावर मानवी साखळीतून साकारलेली पुस्तकाची आकृती.
---
शाळा- महाविद्यालयात वाचन संस्कृतीचा जागर
---
वाचन प्रेरणा दिन : डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जयंतीनिमित्त अभिवादन
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १७ : माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जयंतीनिमित्त शहर व परिसरातील विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये वाचन प्रेरणा दिन प्रेरणादायी वातावरणात पार पडला. डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविणे, अवांतर वाचनाची आवड निर्माण करणे आणि डिजिटल युगातही पुस्तकांचे महत्त्व पटवून देणे या उद्देशाने विविध शैक्षणिक संस्थांमध्ये ग्रंथप्रदर्शन, वाचन स्पर्धा, ऑनलाइन प्रश्नमंजुषा आणि सामूहिक वाचन यांसारख्या विविध उपक्रम राबविण्यात आले. संस्थांचे पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिक्त महापुरुषांची आत्मचरित्रे व अवांतर पुस्तके वाचून बौद्धिक व सर्वांगीण विकास साधण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून वाचनाचे महत्त्व विषद केले.
-
अभय विद्यालय
अभय माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक संजय पवार यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी वाचन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी वाचनाचे महत्त्व विषद केले. ज्येष्ठ शिक्षक जे. बी. सोनवणे यांनी डॉ. कलाम यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत नियमित वाचनाची सवय लावण्याचे आवाहन केले. एम. ए. पाटील यांनी प्रास्ताविक केले. किरण पाटील यांनी आभार मानले.
-
सिंधुरत्नज् इंग्लिश स्कूल
सिंधुरत्नज् एसव्हीसी (महात्माजी) इंग्लिश स्कूलमध्ये उपमुख्याध्यापिका शालिनी मंदान अध्यक्षस्थानी होत्या. पर्यवेक्षक चैतन्य भंडारी उपस्थित होते. श्रीमती मंदान यांच्याहस्ते डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. इयत्ता नववीची विद्यार्थिनी शर्वरी पाटोळे हिने पुस्तकांविषयी मनोगत व्यक्त केले. पर्यवेक्षक भंडारी यांनी डॉ. कलाम यांच्या जीवनातील प्रसंग सांगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षिका काजल लखवानी यांनी सूत्रसंचालन केले.
-
पिंपळादेवी विद्यालय
मोहाडी उपनगर येथील श्री पिंपळादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. उपमुख्याध्यापक ए. आर. पाटील अध्यक्षस्थानी होते. त्यांच्या हस्ते डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिवानी शार्दुल, राजेश्वरी देवरे, आर्यवीर रवंदळे, जान्हवी खोमणे, सायली शिंदे, लावण्या वायसे, ध्रुवी मिस्तरी तसेच उपशिक्षक एस. व्ही. शिंदे यांनी मनोगतातून वाचनाचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमास पर्यवेक्षक एस. एन. सोनवणे, बी. जी. पाटील, एस. डी. देवरे, डी. ए. देवरे व दिलीप पाटील उपस्थित होते. धनंजय चव्हाण व रईस फकीर यांनी सूत्रसंचालन केले.
-
प्रा. निकम कॉलेज
प्रा. रवींद्र निकम कॉलेज ऑफ फार्मसी येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे उपाध्यक्ष रोहित निकम यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. प्राचार्य डॉ. जसवंत लामले, ग्रंथपाल नरेंद्र पवार व विशाल चौधरी यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच महापुरुषांचे आत्मचरित्र वाचून बौद्धिक विकास करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. अविनाश पाटील, प्राचार्य डॉ. सागर जाधव, डॉ. नमिता जाधव, झीशान नाथानी उपस्थित होते.
-
विद्याधन महाविद्यालय
वलवाडी येथील विद्याधन महाविद्यालयात प्राचार्य डॉ. के.बी. पाटील यांनी डॉ. अब्दुल कलाम यांच्या संघर्षमय जीवनावर व वाचनप्रेमावर प्रकाश टाकला. ग्रंथालय प्रमुख तथा विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. योगेश बोरसे यांनी ग्रंथप्रदर्शन व पुस्तकांचे महत्त्व सांगितले. तर प्रमुख पाहुणे प्रा. अमोल नाईकडा यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास सचिव हर्षल पाटील, संचालिका डॉ. जागृती पाटील, डॉ. मंजुषा पवार यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.
-
पालेशा महाविद्यालय
मा. ध. पालेशा वाणिज्य आणि कला व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य डॉ. प्रभाकर महाले अध्यक्षस्थानी होते. त्यांनी विद्यार्थ्यांना अवांतर वाचन करून डॉ. कलाम यांच्याकडून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. हेमंत जोशी यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. आकाश पवार, प्रा. विशाखा जाधव यांच्यासह इतर प्राध्यापक, रासेयो स्वयंसेकवकांनी परिश्रम घेतले.
-
विसपुते विद्यालय
बापूसाहेब डी. डी. विसपुते माध्यमिक विद्यालयात प्राचार्य पी. बी. पाटील अध्यक्षस्थानी होते. त्यांनी वाचाल तर वाचाल असा संदेश देत विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात अवांतर वाचनाचे महत्त्व पटवून दिले. अविनाश पाटील यांनी विद्यार्थ्यांना डिजिटल साधनांचा वापर करून ऑनलाइन प्रश्नमंजुषा सोडवण्याबाबत प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला एस. आर. पाटील, डी. डी. पवार, ए. के. पाटील, एस. बी. भदाने यांच्यासह इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
-
जयहिंद हायस्कूल
जयहिंद शैक्षणिक ट्रस्ट संचलित जयहिंद हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुख्याध्यापक डी. व्ही. निकम, उपमुख्याध्यापिका एम. व्ही. पिंपळीस्कर, पर्यवेक्षिका ए. एन. पाटील, ठीगंळे, एस. यू. पाटील, रूपाली चौधरी, कार्यालयीन अधीक्षक योगेश शिंदे व ग्रंथपाल अभिजीत साळुंखे उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. दहावीचा विद्यार्थी कुंदन देवरे याने कविता सादर केली. विद्यार्थ्यांनी वाचनाची शपथ घेतली. मुख्याध्यापकांच्या हस्ते ३०० ते ४०० ग्रंथांच्या वाचन कक्षाचे उद्घाटन झाले. एन. ए. शिंदे, पी. पी. साळुंखे, एस. एल. पवार, ए. के. तावडे व जे. आर. वाघ यांनी संयोजन केले. संस्थेचे अध्यक्ष विजय पितांबर पाटील व संचालक मंडळाने या उपक्रमाचे कौतुक केले.
-
हस्ती स्कूल, दोंडाईचा
भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त हस्ती चॅरिटेबल ट्रस्ट संचलित हस्ती पब्लिक स्कूल व ज्यू. कॉलेज, हस्ती वर्ल्ड स्कूल व हस्ती गुरुकुल दाऊळ शिवार दोंडाईचा येथे वाचन प्रेरणा दिन हस्ती ग्रुप ऑफ स्कूल्सचे अध्यक्ष कैलास जैन यांच्या मार्गदर्शनात उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी मध्यवर्ती मैदानावर डॉ. कलाम, हस्तीमल जैन, शांतीलाल जैन व कांतिलाल जैन यांच्या प्रतिमांचे पूजन हेड बॉय व हेड गर्ल यांनी केले. याप्रसंगी हस्ती पब्लिक स्कूलच्या प्राचार्या रजिया दाऊदी, हस्ती वर्ल्ड स्कूलचे प्राचार्य जीवन सपकाळे, हस्ती गुरुकुलचे मुख्याध्यापक सदाशिव महाजन व सर्व समन्वयक उपस्थित होते. मैदानावर विद्यार्थ्यांनी पुस्तकाची आकृती आणि मध्यभागी ज्ञानरूपी सूर्य साकारून पुस्तक वाचन केले. ही कलाकृती कलाशिक्षक राहुल भामरे, प्रमोद कोळी व कलाशिक्षिका आरती माळी यांनी साकारली. हस्ती वर्ल्ड स्कूलमध्ये पहिली व दुसरीसाठी जलद वाचन स्पर्धा, तर तिसरी ते दहावीसाठी सामूहिक वाचन व चित्र पाहून गोष्ट लिहिण्याच्या स्पर्धेचे बक्षीस वितरण झाले. हस्ती गुरुकुल येथे विद्यार्थ्यांनी दररोज वाचनाची प्रतिज्ञा घेतली. गोरख वाघ व पंकज जाधव यांनी मार्गदर्शन केले. क्रांती बोरसे यांनी प्रतिज्ञा वाचन केले. ग्रंथालय विभागप्रमुख किशोर माळी, काळू गवळी, सागर गोराणे व योगेश बागले यांनी संयोजन केले.
-
एसएसव्हीपीएस महाविद्यालय
श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या कै. क. डॉ. पा. रा. घोगरे कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. उपप्राचार्य आर. के. पाटील, डॉ. एस. वाय. पाटील आणि डॉ. पी. बी. नेरपगार यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होणे गरजेचे आहे. वाचनाने ज्ञानात भर पडते, विचारशक्ती विकसित होऊन कल्पनाशक्तीला चालना मिळते आणि व्यक्तिमत्त्व समृद्ध होते, असे डॉ. एस. वाय. पाटील यांनी सांगितले. डॉ. नेरपगार यांनी सूत्रसंचालन केले.
---