NSK26H34119 : अभयकुमार जैन
--
महाराष्ट्र चेंबरच्या गव्हर्निंग
कौन्सिलवर अभयकुमार जैन
--
दोंडाईचाच्या उद्योगविश्वाला राज्यस्तरीय प्रतिनिधित्व
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ३१ : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲन्ड ॲग्रीकल्चरच्या गव्हर्निंग कौन्सिलवर दोंडाईचा येथील अभयकुमार जैन यांची २०२६- २०२८ या शतकमहोत्सवी कार्यकाळासाठी स्वीकृत सदस्य म्हणून निवड झाली. चेंबरचे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी उपाध्यक्ष महेंद्र अग्रवाल यांच्यामार्फत ही माहिती दिली. या निवडीमुळे दोंडाईचा परिसरातील व्यापारी, उद्योजक आणि कृषी क्षेत्राचे प्रश्न राज्यस्तरीय व्यासपीठावर मांडण्यास बळ मिळणार आहे.
हस्ती भवनात महाराष्ट्र चेंबर व हस्ती बँकेच्या पुढाकाराने व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रम नुकताच झाला. यात माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष महेंद्र अग्रवाल व सीए प्रकाश पाठक यांच्या उपस्थितीत ६० जणांचे सदस्य नोंदणी अर्ज सुपूर्द करण्यात आले, तसेच गाव तिथे उद्योजक अंतर्गत उद्योग विचार मंच स्थापन करून शिंदखेडा-दोंडाईचा विभागात काम करण्याचे आश्वासन देण्यात आले. अभयकुमार जैन यांच्या निवडीबद्दल पालकमंत्री जयकुमार रावल, उद्योगपती सरकारसाहेब रावल, हस्ती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक जैन, हस्ती बँकेचे अध्यक्ष किशोर जैन, केशरानंद समूहाचे ज्ञानेश्वर भामरे, हितेंद्र कवाड, रमेश कुकरेजा, संजय दुग्गड, रतनलाल कोठारी, विजय पाटील, श्रीकृष्ण अग्रवाल, ब्रजेश शाह, गिरधारी रूपचंदानी, नीलेश भोजवानी, मनोहर पाटील, धर्मचंद बोथरा, राजेश माखिजा, लव केसवानी, राजेंद्र गेलडा, शैलेश धनगर, योगेश माहेश्वरी, रवींद्र पाटील, संजय जैन, जगदीश सराफ, अमरीश जैन, जयदीप सेठ, हमजा जिनवाला, यशपाल शर्मा, श्रेयांश कुचेरिया, हेम पटेल, कन्हैया बागल, रामकृष्ण चौधरी, विजय पुरसवानी, अमित पवार, दीपक बोधवानी, सुनील पुरसवानी, प्रशांत ठोमरे, नरेंद्र बडगुजर, पंकज चोळके, सुनील चौधरी, योगेश जैन, चेतन जैन, अंकित वाघेला, मनोज छाजेड, अक्षय बोरसे, वीरेंद्र जैन, चोईथ कुकरेजा, हेमंत सोनार, गौतम माखिजा, गुलाम शेख, सूरज अग्रवाल, कैलास जैन आदींनी स्वागत केले.