Crime News : अभोणा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील चोरीचा छडा लागला; तिघांना अटक
Abhona Police Expect More Theft Cases to Be Uncovered : अभोणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ट्रॅक्टरच्या हायड्रोलिक पट्ट्यांची चोरी करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अभोणा- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केट परिसरात ट्रॅक्टरच्या हायड्रोलिक पट्ट्यांची चोरी करणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.