वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा विचार करताय? मग हे वाचाच

Doctors.jpg
Doctors.jpg

नाशिक : देशात, राज्यात वैद्यकीय शिक्षणाचे अनेक पर्याय उपलब्ध असले तरी प्रवेशास इच्छुक विद्यार्थ्यांची संख्याही तुलनेने लक्षणीय आहे. तसेच परदेशात शिक्षणाचे ध्येय असलेल्या विद्यार्थ्यांची संख्याही त्याच प्रमाणात वाढत आहे. अशात वैद्यकीय शिक्षणात परदेशामध्ये मुबलक पर्याय, संधी उपलब्ध आहेत. (Carees After HSC)

शिक्षणानंतर मायदेशात सेवेची संधी

विविध विद्यापीठांच्‍या योजनांतून शिष्यवृत्ती मिळत असल्याने आर्थिक बोझा कमी करता येऊ शकतो. दर वर्षी परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाणही वाढत आहे. प्रामुख्याने वैद्यकीय शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. देशात वैद्यकीय महाविद्यालये तुलनेने कमी असल्याने डॉक्टर होऊ इच्‍छिणाऱ्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाचे दालन खुले आहे. परंतु परदेशात शिक्षण घेऊ इच्‍छिणाऱ्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनी दक्षता घेणे गरजेचे आहे.

शिष्यवृत्तीचे बळ

परदेशातील विद्यापीठाच्या पदवी वैध आहेत का, तिथून शिकल्यावर प्लेसमेंट मिळेल का, असे अनेक प्रश्न पालकांनाही पडतात. परंतु यासाठी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाकडून महाविद्यालयांची वेधता कळू शकते. प्रवेशासाठी निवड केलेले महाविद्यालय इंग्रजी माध्यमातील आहे का, याची पडताळणी केली पाहिजे. त्यासाठी सरकारमान्य संकेतस्थळ पाहावे किंवा तेथील किमान पाच विद्यार्थ्यांकडे चौकशी करणे आवश्यक आहे. 

परवडणाऱ्या शुल्‍कात शिक्षण

अनेकांना परदेशातील शिक्षण कदाचित महाग वाटू शकते. परंतु वस्तुस्थिती तशी नाही. प्रत्यक्षात परदेशातील वैद्यकीय विद्यापीठातले शिक्षण भारतातील एमबीबीएसच्या तुलनेत परवडण्या जोग्या खर्चात होत असल्‍याचे जाणकारांचे म्‍हणणे आहे. अनेक महाविद्यालयांत सुलभ हप्त्यांच्या शैक्षणिक कर्जाचीही सोय उपलब्ध असल्याने मध्यमवर्गीय मुलांनाही डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. किर्गीस्‍तान, उझबेगिस्‍तान, रशियामध्येही वैद्यकीय शिक्षणाच्‍या संधी उपलब्ध आहेत. 

सावधगिरी महत्त्वाचीच

विद्यार्थी ज्‍या एजन्‍सी, संस्‍थेमार्फत परदेशात शिक्षणासाठी जात असेल, अशा संस्‍थेशी संलग्‍न किती विद्यार्थी घडले आहेत, याची फेरपडताळणी आवश्‍यक आहे. महाविद्यालयाचे शुल्‍क महाविद्यालयाच्‍या पत्रावर (लेटरहेड) नमूद असावे. डॉलरचा कन्व्हर्जन रेट पाहूनच पुढील निर्णय घ्यावा; अन्‍यथा दरातील फरक खिशाला मोठी झळ बसवू शकतो. 

परवडणाऱ्या शुल्‍कात विद्यार्थ्यांना शिक्षणाचा पर्याय उपलब्‍ध असला, तरी शुल्‍क डॉलरमध्ये असल्याने डॉलर कन्व्हर्जन रेटवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. महाविद्यालय निवडतांना भारतीय अभ्यासक्रम शिकवणारे असावेत. भारतीय अभ्यासक्रमाची पुस्तके सोबत न्‍यावीत. आम्‍ही राज्‍यातील सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी पाठविले असून, या विद्यार्थ्यांचा अनुभव चांगला आहे. ‘नीट’च्‍या निकालापूर्वी परदेशात प्रवेशाचा विचार विद्यार्थी करू शकतात. - डॉ. अमित बोराडे संस्थापक, फ्युचर डॉक्टर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com