पाच हजारांचा लाच घेताना कृषी अधिकाऱ्यास रंगेहाथ पकडले | Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik Crime

नाशिक | पाच हजारांचा लाच घेताना कृषी अधिकाऱ्यास रंगेहाथ पकडले

sakal_logo
By
रखमाजी सुपारे

पेठ (जि. नाशिक) : कृषी दुकानातील स्टॉक व कृषी केंद्राचा परवाना नुतनीकरण सुलभ व्हावे यासाठी पेठ तालुका कृषी अधिकारी अरविंद पगारे यांना पांच हजाराची लाच स्विकाराताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडले असून गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु आहे .

सविस्तर माहिती अशी की , करंजाळी ( ता. पेठ )येथील कृषी केंद्र संचालक यांच्या तक्रारीनुसार मु. करंजाळी तालुका पेठ, जिल्हा . नाशिक येथील कृषी केंद्राचे,शेती उपयोगी बी बियाणे, रासायनिक खते व कीटक नाशके यांचा स्टॉक योग्य असल्याचे दाखवणे तसेच कृषी केंद्राच्या परवाना नूतनीकरणासाठी अडचण येवू न देण्यासाठी यातील आलोसे अरविंद पगारे तालुका कृषी अधिकारी यांनी तक्रारदार यांच्याकडे 5000/- रुपये लाचेची मागणी केली आणि ती लाचेची रक्कम आलोसे अरविंद पगारे यांनी पंचासमक्ष आज स्वीकारली असता त्यांना लाचेच्या रकमेसह रंगेहात पकडण्यात आले असून गुन्हा नोंद करण्याचे काम चालू आहे. हॅश व्हॅल्यू व फोटोग्राफ घेण्यात आले आहेत..

पोलिस अधिक्षक सुनील कडासने ल.प्र.वि, नाशिक व सतीश डी. भामरे, प्रभारी अप्पर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि, नाशिक परिक्षेत्र, यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी अनिल बागूल, जयंत शिरसाठ, पोलीस निरीक्षक, पो.ना.किरण अहिरराव, पो.ना. अजय गरुड पो. ना. नितीन कराड पो. ना. प्रभाकर गवळी. यानी सापळा रचून लाच स्विकारताना रंगेहात पकडले.

loading image
go to top