Malegaon  News
Malegaon Newssakal

Malegaon News : रस्त्यावरील खडीमुळे अपघाताची शक्यता

खडीमुळे वाहनांच्या छोट्या मोठ्या अपघातांची शक्यता वाढली आहे ; कामाची गती वाढवावी अशी मागणी नागरिक व व्यावसायिक यांनी केली
Published on

मालेगाव शहर- शहरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत अनेक ठिकाणी कामे जोरदार सुरू आहेत. मोठ्या प्रमाणावर कॉंक्रीट रस्ते होत असल्याने नागरिकांची सोय होणार आहे. मालेगावच्या कॉलेज स्टॉप ते डिके चौक भागापर्यंत रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर खडी पडलेली आहे. या खडीमुळे वाहनांच्या छोट्या मोठ्या अपघातांची शक्यता वाढली आहे. कामाची गती वाढवावी अशी मागणी या परिसरातील नागरिक व व्यावसायिक यांनी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com