पीक पाहाणीत अचूक नोंद घ्यावी : पाटील

पीक पाहाणीत अचूक नोंद घ्यावी : पाटील
Published on: 
पीक पाहणीत अचूक नोंद घ्या --- अपर जिल्हाधिकारी पाटील यांच्या यंत्रणेला सूचना सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ६ : पीक पाहणीवेळी शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतावर जाऊन पिकांची अचूक नोंद घ्यावी. क्षेत्राची योग्य माहिती घेताना उपलब्ध नोंदीमध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नये, यासाठी विशेष काळजी घ्यावी. तसेच, पीक पाहणीत येणाऱ्या तांत्रिक व क्षेत्रीय अडचणींची माहिती घेताना तातडीने त्याचे निराकरण करावे, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांनी पीक पाहणी सहाय्यकांना केल्या. निफाड तालुक्यातील चांदोरी व पिंपळस येथे हेमांगी पाटील यांनी मंगळवारी (ता. ६) प्रत्यक्ष भेट दिली. या वेळी त्यांनी ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत मोबाईल ॲपद्वारे सुरू असलेल्या पीक पाहणी नोंदणीच्या कामकाजाची माहिती जाणून घेतली. शेतकऱ्यांशी संवाद साधताना पीक पाहणीतील अडचणी जाणून घेतल्या. या वेळी तहसीलदार विशाल नाईकवाडी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. अपर जिल्हाधिकारी पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना पीक पाहणीतील अचूक नोंदीमुळे पिकांची वस्तुनिष्ठ माहिती प्रशासनाकडे उपलब्ध होण्यास मदत होते. त्यामुळे भविष्यात कृषी नियोजन, शासकीय योजना व आवश्यक मदतीसाठी या नोंदी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. पीक पाहणीचे कामकाज पारदर्शक, अचूक व विहित कालावधीत पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर असल्याचे पाटील यांनी सांगितले. या वेळी शेतकऱ्यांनी पीक पाहणी नोंदणीतील अडचणी व अपेक्षा मांडल्या. पीक पाहणीचे महत्त्व विशद पीक पाहणी नोंदणीचे महत्त्व, नोंदणीची प्रक्रिया व त्यातून उपलब्ध होणाऱ्या शासकीय सुविधांबाबतची माहिती अपर जिल्हाधिकारी पाटील यांनी शेतकऱ्यांना दिली. तसेच, पीक पाहणी नोंदणीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून घेतले. मोबाईल ॲपच्या माध्यमातून पीक पाहणीची नोंद कशी करण्यात येते, नोंदणीदरम्यान कोणत्या बाबींची दक्षता घ्यावी, याची माहिती त्यांनी प्रत्यक्ष पाहणीद्वारे घेतली. फोटो क्रमांक : एच-31500

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com