नाशिकमध्ये तब्बल 15 प्लेटिंग उद्योगांवर कारवाई; संतप्त भावना

nashik plating
nashik plating esakal

सातपूर (नाशिक) : मागील आठवड्यात सीएटीपी प्रकल्पाच्या प्रश्नांबाबत प्लेटिंग उद्योग संघटनांसह आयमाने निवेदन देऊन कारवाई करू नये, अशी मागणी केली होती. मात्र, उद्योगमंत्र्याची पाठ फिरताच प्लेटिंग उद्योगावर एमपीसीबीने कारवाईचा बडगा उगारला आहे. यामुळे शेकडो प्लेटिंग उद्योजक उद्योग भवनात येवून संतप्त भावना व्यक्त करताना पाहायला मिळाले. (Action-against-15-plating-industries-marathi-news-jpd93)

उद्योगमंत्र्याची पाठ फिरताच कारवाईचा बडगा

नाशिकमधील औद्योगिक क्षेत्रात कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट (CETP) होण्यासाठी काही वर्षांपासून उद्योजकांच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रयत्न करीत आहे. मधल्या काळात याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार CETP प्रकल्पाची किंमत मोठी असल्याने हा प्रकल्प महाराष्ट्र विकास महामंडळाने उभा करून तो कार्यान्वित करावा, असे सांगितले आहे. CETP प्रकल्प पूर्ण होत नाही, तोपर्यत उद्योजकांना प्रदूषण नियंत्रणाची परवानगी न देण्याची भूमिका महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतली आहे. त्यामुळे CETP प्रकल्पाबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा व कारवाईला दिलेली स्थगिती तशीच ठेवण्याची मागणी प्लेटिंग उद्योजक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उद्योगमंत्र्यांकडे केली होती. याबाबत महापौर, भाजप पदाधिकाऱ्यांनी नदी प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित करून कारवाई करण्याची मागणी केली होती. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने वेळोवेळी पाहणी अहवाल सादर केले जात असताना, सीईटीपीला होत असलेला विरोध पाहता न्यायालयाने प्लेटिंग उद्योगावर एमपीसीबीने कारवाई करण्याबाबत आदेश दिल्याने मंगळवारी (ता. २७) १५ प्लेटिंग उद्योगांवर कारवाई केली. यामुळे संतप्त झालेले उद्योजक एमपीसीबी व उद्योग विभागात कारवाई टाळण्याची मागणी करताना पाहायला मिळाले. इंद्रपाल सहानी, सुरेश डोंगरे, समीर पटवा व उद्योजक उपस्थित होते.

nashik plating
सोयाबीनची ऐतिहासिक उसळी; उच्चांकी भावाचा शेतकऱ्यांचा फायदा कमीच
nashik plating
साहित्य संमेलनाबाबत निर्णयाची घाई करू नका - जिल्हाधिकारी मांढरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com