डोंगर फोडणाऱ्यांवर कारवाई करणार - पालकमंत्री भुजबळ

bhujbal
bhujbalesakal
Updated on
Summary

त्र्यंबकेश्वर हा पश्चिम इको झोन मधील परिसर असून या भागातील डोंगरांचे बेसुमार उत्‍खनन सुरु आहे. अनेक पर्यावरणी दृष्ट्या महत्वाचे संवेदनशील डोंगर फोडून त्याची दगड विटा मुरुमाची तस्करी सुरु आहे.

नाशिक : पावसाच्या तालुके असलेल्या इगतपुरी त्र्यंबकेश्वर परिसरात डोंगर भुईसपाट करुन अवैधपणे काम होत असल्याने हे प्रकार रोखण्यासाठी पर्यावरणीय इको सेंन्सेटीव्ह झोनचे (Eco Sensitive Zone) सिमांकन करण्याच्या सुचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. अशी माहीती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. (Action against break the mountain-Chhagan Bhujbal)

कारवाई नावालाच...

त्र्यंबकेश्वर हा पश्चिम इको झोन मधील परिसर असून २०१३ पासून या भागातील डोंगरांचे बेसुमार उत्‍खनन सुरु आहे. अनेक पर्यावरणी दृष्ट्या महत्वाचे संवेदनशील डोंगर फोडून त्याची दगड विटा मुरुमाची तस्करी सुरु आहे.

डोंगर फोडायचे महसूल विभागाने दंड आकारणीच्या कारवाया केल्याचे दाखवायचे नंतर महसूल यंत्रणेतील विविध लवादात पून्हा या कारवाया शिथील करीत जैसे थे सुर ठेवायचे असा फंडा या भागात रुजला आहे. सकाळने वेळोवेळी या विषयाचा पाठपुरावा केला होता. त्र्यंबकेश्वर नगरपालिकेतील झोन बदलाच्या नावाखाली पर्यावरणीय डोंगर फोडण्याच्या प्रकारात नगराध्यक्षाला पायउतार व्हावे लागले.

bhujbal
नाशिक ‘रेड झोन' बाहेर; लॉकडाउन निर्बंधाबाबत फेरविचार

ब्रम्हगिरीच्या नरडीला नख!

दरम्यान सध्याही राज्यातील १३ जिल्ह्यातून वाहणाऱ्या जीवनदायीनी गोदावरीचे उगमस्थान असलेल्या त्र्यंबकेश्वरला ब्रम्हगिरीच्या नरडीला नख लावून तो भुईसपाट करण्याचे कारस्थान सुरु आहे. त्याविषयी पालकमंत्री भुजबळ आणि जिल्हाधिकारी आज प्रथमच जाहीरपणे बोलले. ब्रम्हगिरी कोरण्याच्या प्रकरणात संबधितावर गुन्हा दाखल करण्यात आला असून दिड कोटीचा दंड आकारला आहे. त्यासोबत इको सेंन्सेटिव झोनमध्ये समावेश होणाऱ्या परिसाराचे सिमांकन करण्यात येणार असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

(Action against break the mountain-Chhagan Bhujbal)

bhujbal
कावळ्याचे घरटे देताहेत चांगल्या पावसाचा सांगावा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com