Latest Marathi News | अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; 16 लाखाचा गुटखा जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Food and Drug Administration

Nashik News : अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; 16 लाखाचा गुटखा जप्त

सिडको : नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आयशर ट्रकमधून (एमएच- १८- बीजी- ४०४४) १६ लाख ५८ हजार ५६० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. अवैध पान मसाला व सुगंधी तंबाखूचा साठा ट्रकमधून घेऊन जाणार असल्याची बातमी अन्न व औषध प्रशासनास मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. सोबतच १५ लाखाचा ट्रकही जप्त करण्यात आला आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाला मंगळवारी (ता. २०) सांयकाळी गुप्त माहिती मिळाल्यानंतर पाथर्डी फाट्याच्या पुढे नेहरू उद्यानाजवळ आयशर ट्रकची थांबवून त्याची झडती घेतली. झाडाझडती घेतली असता, इतर साहित्य सोबत विविध प्रकारचा पान मसाला व सुगंधी तंबाखूचा साठा आढळून आला. (Action by the Food and Drug Administration Gutkha worth 16 lakh seized Nashik News)

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

हेही वाचा: Nashik News : भद्रकाली पोलिसांकडून संशयिकाकडून चोरीच्या 20 दुचाकी हस्तगत

सदर ट्रकचालक व माल अंबड पोलीस ठाण्यात आणण्यात आला. रात्री उशिरापर्यंत याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

सदर कार्यवाही सहआयुक्त गणेश परळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ऊ. सि. लोहकरे, विवेक पाटील, सहाय्यक आयुक्त, प्रमोद पाटील अन्न सुरक्षा अधिकारी, योगेश देशमुख, गोपाळ कासार, अविनाश दाभाडे, विकास विसपुते नमुना सहाय्यक अधिकारी, निवृत्ती साबळे वाहनचालक यांच्या पथकाने केली. सदर माल कोणाकडे जाणार होता व कोणाचा आहे, याबाबत अधिक तपास सुरू आहे.

हेही वाचा: Nashik News : सर्पमित्र नितीन सोनवणे यांनी पकडला दुर्मिळ Black Cobra

टॅग्स :NashikActionsmoking