
अंबासन, (जि.नाशिक) : ताहराबाद वनपरिक्षेत्राच्या हद्दीत गेल्या अनेक वर्षांपासून अवैध वृक्षतोड करून अवैध वाहतूक केली जात होती. वनपरिक्षेत्र आधिकारी शिवाजी सहाणे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध लाकूड वाहतूकीसह वृक्षतोड करणा-यांवर धडक कारवाई करीत दोन वाहने सिनेस्टाईलने पकडून जप्त केली आहेत यामुळे लाकूड माफियांचे धाबे दणाणले आहे.
वनविभागाचा धाक नसल्याने सुरू होती सर्रासपणे वाहतूक
मोसम, काटवन, करंजाडी व मुल्हेर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून अवैध वृक्षतोड करून बिनबोभाट वाहतूक केली जात होती. वृक्षतोडीमुळे जंगलच्या जंगल बोडकी होत चालल्याने जंगली श्वापदे गावकुसाबाहेर नागरिकांच्या निदर्शनास येत आहेत. लाकूड माफीयांना वनविभागाचा धाक नसल्याने सर्रासपणे रस्त्यावरून निंब, आंबा, घराची जुनी सागवान लाकूड, बाभूळ अशी अनेक जंगली लाकडांची वाहतूक केली जात होती. काही दिवसांपूर्वी वनपरिक्षेत्र आधिकारी शिवाजी सहाणे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दोन आठवड्यात संपूर्ण ताहाराबाद वनपरिक्षेत्रात टेहळणी केली. त्यानंतर या परिसरात वृक्षतोड थांबण्याने गरजेचे असल्याचे श्री. सहाणे यांच्या निदर्शनास आले.
सहाणे यांनी वनकर्मचा-यांना बरोबर घेऊन गस्तीपथक सुरू केले. वनकर्मचा-यांचे सहकार्य लाभत असल्याने पहिल्याच दिवशी गस्तीवर असतांना दिसून आले असून ताहाराबादहुन मालेगावच्या दिशेने जात असलेल्या लाकडाने खचाखच भरलेला ट्रक (MH-15-AG-2916) सोमपूरनजीक सिनेस्टाईलने पकडण्यात वनकर्मचा-यांना यश आले. त्यात सदर वाहनचालक उडवाउडवीची उत्तर देत असल्याने कर्मचाऱ्यांकडून झाडाझडती घेतली असत आंब्याच्या लाकडांनी भरलेला आढळून आला. ट्रकला ताब्यात घेऊन ताहाराबाद वनविभागाच्या आवारात उभा केला त्यानंतर पुन्हा गुप्त माहितीच्या आधारावर याच रस्त्यावरून एक अवैध लाकूड घेऊन जाणारे वाहन (क्र.MH-31-AP-7195) जात असल्याचे समजताच त्या वाहनालाही ताब्यात घेऊन वनकर्मचा-यांनी कारवाई केली.
ताहाराबाद वनविभागाकडून अवैध लाकूड वाहतूक व वृक्षतोडीवर कारवाई सुरू करताच लाकूड माफीयांची पळापळ सुरू झाली आहे. या कार्यवाहीत वनपरिक्षेत्र आधिकारी शिवाजी सहाणेसह वनकर्मचारी विनायक देवरे, विलास शिंदे, अविनाश पाटिल, कृष्णा बोरसे, सय्यद हरून संदिप गायकवाड, सुनिता बहिरम, गौरव आहिरे, वर्षा सोनवणे, संगिता चौरे, रेणुका आहिरे, आकाश कोळी, राहुल पाटिल, पल्लवी कोळी, राजेंद्र साळुंखे आदिंनी पथकात सहभाग घेतला होता.
''वनपरिक्षेत्रात कुठल्याही प्रकारे अवैध वृक्षतोड किंवा वाहतूकीवर गय केली जाणार नाही कायदेशीर कारवाई केली जाईल.'' - शिवाजी सहाणे, वनपरिक्षेत्र अधिकारी ताहाराबाद.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.