ज्यादा दराने बियाणे, खते विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा : जिल्हाधिकारी

जिल्हास्तरीय कृषी निवष्ठा सनियंत्रण समितीची बैठक
Meeting in coolectore office
Meeting in coolectore officeSakal

नंदुरबार - येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना चांगल्या दर्जांचे बियाणे, रासायनिक खते,कीटकनाशके, आदी कृषी निविष्ठा उपलब्ध करुन देण्यासाठी योग्य नियोजन करावे , जादा दराने विक्री बियाणे,खते तसेच कृषी निविष्ठा विक्री करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय कृषी निवष्ठा सनियंत्रण समितीची बैठक झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नीलेश भागेश्वर, जिल्हा कृषी अधिकारी एल.डी.भोये, महाबिजचे जिल्हा व्यवस्थापक बी. जी. कोटकर, मोहीम अधिकारी महेश विसपुते, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नरेंद्र पाडवी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी योगेश हिवराळे, एकनाथ कदम आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी मनीषा खत्री म्हणाल्या, खरीप हंगाम २०२२-२०२३ साठी शेतकऱ्यांना उपलब्ध करुन येणाऱ्या बियाणे चांगल्‍या दर्जाची असावेत. प्रत्येक विक्रेत्याने साठा तसेच दर दर्शविणारे फलक दर्शनी भागात लावावेत. साठा रजिष्टर नोंदवह्या अद्ययावत ठेवाव्यात. रासायनिक खते विक्रेत्यांनी पीओएस मशिनद्वारेच खताची विक्री करावी. खताची विक्री शासकीय दरानेच करावी. जादा दराने विक्री बियाणे, खते तसेच कृषी निविष्ठा विक्री करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी. असे त्यांनी नमूद केले.

२२ हजार ६२० क्विंटल बियाण्यांची मागणी : भागेश्वर

खरीप हंगाम २०२२ साठी भात, मका, ज्वारी, बाजरी, सोयाबीन व इतर बियाण्यांसाठी २२ हजार ६२० क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. तर बी.टी कापूस बियाण्यासाठी ६ लाख २५ हजार पाकिटांची मागणी नोंदविण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी खरीप हंगामासाठी ३ हजार ३० मे.टन युरिया व ५९० मे.टन डि .ए.पी. संरक्षितसाठा मंजूर केला आहे. खरीप हंगामासाठी १ लाख ३४ हजार ८०० मे.टन रासायनिक खताची मागणी करण्यात आल्याची माहिती श्री. भागेश्वर यांनी यावेळी दिली. याबैठकीस खते, बियाणे विक्रेते व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com