esakal | नाशिक : कोरोनाचे नियम मोडणाऱ्या मंडळांवर होणार कठोर कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

nashik municipal corporation

नाशिक : कोरोनाचे नियम मोडणाऱ्या मंडळांवर होणार कठोर कारवाई

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : गणेशोत्सव काळात भाविकांची गर्दी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे. त्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने मास्क, सामाजिक अंतर व सॅनिटायझर या त्रिसूत्रीचे पालन न करणाऱ्या नागरिकांबरोबरच सार्वजनिक गणेश मंडळांवरदेखील कठोर कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्रत्येक विभागात तीन याप्रमाणे सहा विभागांसाठी १८ भरारी पथकांची निर्मिती केली आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांनी ही माहिती दिली.

पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याबरोबरच कोरोनाला निमंत्रण ठरू नये, यासाठी महापालिकेने ‘मिशन विघ्नहर्ता’ मोहीम हाती घेतली आहे. कोरोना तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी विविध उपाययोजना महापालिकेने केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गणेशोत्सव काळात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता मास्क, सामाजिक अंतर आणि सॅनिटायझर या त्रिसूत्रीची शहरात काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या त्रिसूत्रीचे उल्लंघन करतील त्यांच्यावर प्रतिव्यक्ती दोनशे रुपये दंड आकारला जाणार आहे. गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनादेखील या त्रिसूत्रीचे पालन करावे लागणार आहे. यासाठी आरोग्य विभागाकडून सहाही विभागात १८ भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक पथकात आरोग्य विभागातील तीन कर्मचारी असणार असून, स्वच्छता निरीक्षक, विभागीय स्वच्छता निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी भाविकांकरीता ऑनलाइन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी. यासाठी मंडळांनी लिंक तयार करून महापालिकेला उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा: "तुरुंगात असताना कार्यकर्त्यांना खाली पाहावे लागल्याचे दुःख"

निर्माल्य रथ फिरणार

गणेशोत्सवात निर्माल्य गोळा करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून निर्माल्य रथाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सहाही विभागात हे निर्माल्य रथ फिरणार असून, गणेश मंडळ व नागरिकांनी आपल्याकडील निर्माल्य कलश वा निर्माल्य रथात टाकावे. पीओपीच्या मूर्ती नदीपात्रात विसर्जित करू नये. या मूर्तींचे विघटन होण्यासाठी महापालिकेच्या सहाही विभागीय कार्यालयांमध्ये अमोनिअम बायोकार्बोनेटची

हेही वाचा: १३ वर्षांपासून मोईन खानकडून बाप्पाची भक्ती; इतरांसाठी ठरतेय आदर्श

loading image
go to top