नाशिकचे मूक आंदोलन ऐतिहासिक ठरावे; पूर्वनियोजन बैठकीतील सूर

maratha reservation
maratha reservationesakal


पंचवटी (नाशिक) : सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) नाकारल्याने युवकांच्या भावना तीव्र असून, ही वादळापूर्वीची शांतता आहे. मूक आंदोलनासाठी (silent movement) जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांसह सर्वपक्षीय खासदार, आमदारांना निमंत्रित केले असून, आरक्षणासंदर्भात त्यांची भूमिका जाणून घेतली जाणार आहे. समाजाला खरोखर हक्क मिळवायचे असेल, तर नाशिकचे मूक आंदोलन ऐतिहासिक ठरावे, असा सूर शुक्रवारी (ता. १८) झालेल्या बैठकीतून उमटला. (activists said that nashik maratha reservation silent movement should be historic)

न्यायालयाने मराठा आरक्षण फेटाळले आहे. या पार्श्‍वभूमीवर समाजातील लोकप्रतिनिधींच्या भावना समजून घेण्यासाठी सोमवारी (ता. २१) खासदार त्रपती. संभाजीराजे यांच्या उपस्थितीत मराठा क्रांती मूक मोर्चा आंदोलनाची हाक दिली आहे. गंगापूर रस्त्यावरील रावसाहेब थोरात सभागृहाशेजारील मोकळ्या पटांगणावर सकाळी दहा ते दुपारी एकदरम्यान होणारे या आंदोलन यशस्वी करण्यासंदर्भात शुक्रवारी औरंगाबाद रोडवरील वरद लक्ष्मी लॉन्सवर बैठक झाली.
बैठकीला करण गायकर, माजी आमदार जयवंत जाधव, शिवसेनेचे दत्ता गायकवाड, ॲड. शिवाजी सहाणे, राजू देसले, तुषार जगताप, गणेश कदम यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण नाकारल्याबद्धल समाजाच्या तीव्र भावना बहुसंख्य वक्त्यांनी व्यक्त केल्या. रस्त्यावरील आंदोलनापेक्षा केंद्र व राज्य सरकारवर दवाब वाढविण्याची गरजही या वेळी अनेकांनी व्यक्त केली.

maratha reservation
मराठा आरक्षण: आंदोलन मागे घेणार नाही; सरकारशी चर्चा सुरुच राहिल


…त्यांचा हिशेब ठेवणार

छत्रपतींचा कोल्हापूरइतकाच नाशिक शहरावर विश्‍वास आहे. या मूक आंदोलनासाठी जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांसह सर्वपक्षीय खासदार, आमदारांनाही आमंत्रित करण्यात येणार असून, याद्वारे त्यांची आरक्षणासंदर्भातील भूमिका जाणून घेतली जाणार आहे. याठिकाणी उपस्थित न राहणाऱ्या लोकप्रतिनिधींचा हिशेब ठेवणार असून, आगामी निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखविली जाईल. कारण समाजापेक्षा कोणीही मोठे नाही, असे मत करण गायकर यांनी व्यक्त केले. या आरपारच्या लढाईत राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून सर्वच लोकप्रतिनिधींनी सहभागी व्हावे, असे मत बहुसंख्य वक्त्यांनी व्यक्त केले.


ड्रेसकोडची घोषणा

सकाळी दहा ते दुपारी एक असे तीन तास चालणाऱ्या या आंदोनासाठी प्रत्येकाने काळा शर्ट, तोंडाला काळा मास्क परिधान करावा, हे शक्य नसेल तर किमान काळ्या फिती लावून आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन राज्य समन्वयक करण गायकर यांनी केले. आंदोलन मूक असल्याने कोणत्याही नेत्याच्या समर्थनार्थ घोषणा न देण्याचे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

(activists said that nashik maratha reservation silent movement should be historic)

maratha reservation
उदयनराजेंचा सरकारला अल्टिमेटम; 'मराठा आरक्षणा'साठी केल्या 6 मागण्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com