आदर्श सटाणाच्या मुलींची राज्यस्तरीय झेप विभागीय फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद; पोद्दार जळगाववर १-० असा विजय

आदर्श सटाणाच्या मुलींची राज्यस्तरीय झेप विभागीय फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद; पोद्दार जळगाववर १-० असा विजय
Published on: 
फोटो ओळी-06905 सटाणा ः आदर्श स्कूलच्या विद्यालयाचे अभिनंदन करताना संस्थेचे चिटणीस दिलीप दळवी. आदर्श विद्यालयाला फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद सकाळ वृत्तसेवा सटाणा, ता. ८ : आक्रमक खेळ, बचावफळीची भक्कम साथ आणि गोलरक्षकाची प्रभावी कामगिरी यांच्या जोरावर येथील मविप्र समाजाच्या आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलमधील मुलींच्या फुटबॉल संघाने विभागीय स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात पोद्दार जळगाव, महापालिका संघाचा १-० असा पराभव करत आदर्श इंग्लिश मीडियमच्या संघाने विभागीय विजेतेपदावर नाव कोरले. यामुळे या संघाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. शिरपूर येथील अमरिशभाई पटेल स्कूलमध्ये झालेल्या विभागीय स्पर्धेत आठ संघ सहभागी झाले होते. आदर्श सटाणा संघाने पहिल्या सामन्यात जळगाव ग्रामीण संघाचा पराभव केला. त्यानंतर धुळे ग्रामीण संघाला नमवत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात पोद्दार जळगाव महापालिका संघासमोर आदर्श स्कूलच्या खेळाडूंनी संयमाने खेळ करत पराभव केला. मानसी माळी, आराध्या अहिरे, श्रद्धा सोनवणे, श्रावणी देवरे, कल्याणी पवार आणि किमया खैरनार यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. यशाबद्दल ‘मविप्र’चे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, चिटणीस दिलीप, महिला संचालिका शालनताई सोनवणे, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील दादा सोनवणे यांनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com