Latest Marathi News | Nashik : अपर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे हत्याकांड प्रकरणी तिघांना जन्मठेप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

life imprisonment

Nashik : अपर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे हत्याकांड प्रकरणी तिघांना जन्मठेप

मालेगाव (जि. नाशिक) : राज्यात गाजलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला (२५ जानेवारी २०११) मालेगावचे अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे जळीत हत्याकांड प्रकरणी संशयित असलेल्या तिघांविरुध्द गुन्हा सिध्द झाल्याने खुनाच्या आरोपावरुन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

सरकारी कामात अडथळा व संगनमताने हत्याकांड केल्याच्या आरोपावरुनही दोन वेगवेगळ्या कलमान्वये वेगवेगळी शिक्षा सुनावण्यात आली आहे. येथील अप्पर जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. वाय. गौड यांनी गुरुवारी (ता. ८) हा निकाल दिला. तब्बल अकरा वर्षानंतर या खटल्याचा निकाल लागला. (Additional Collector Yashwant Sonwane murder case life imprisonment to 3 Nashik crime Latest Marathi News)

जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या आरोपींमध्ये मच्छिंद्र शिवाजी सुरवडकर, राजेंद्र देविदास शिरसाठ, अजय मगन सोनवणे (तिघे रा. मनमाड) यांचा समावेश आहे. त्यांना कलम ३०२ खुनाच्या आरोपात जन्मठेप, सरकारी कामात अडथळा आणला (कलम ३५३ अन्वये) दोन वर्षे कारावास व कलम ५०६ संगनमताने दमबाजी या आरोपावरुन सात वर्षाची शिक्षा तसेच दोन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

या खटल्याची माहिती अशी : श्री. सोनवणे २५ जानेवारी २०११ ला मनमाड नजीकच्या अवैध इंधन अड्डयावर छापा व इंधन तपासणीसाठी गेले होते. या वेळी संशयित इंधन माफियांनी त्यांना अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळून ठार मारले होते. या हत्याकांडामुळे राज्यात खळबळ उडाली होती.

हेही वाचा: Crime Update : सोनसाखळी चोरताना ‘तो’ दुचाकीची नंबर प्लेट झाकत

या प्रकारणात मुख्य आरोपी पोपट शिंदे, मच्छिंद्र सुरवडकर, राजू शिरसाठ, अजय सोनवणे व कुणाल शिंदे असे पाच आरोपी होते. खटला सुरु असताना मुख्य आरोपी पोपट शिंदे यांचा मृत्यू झाला. कुणाल शिंदे हा गुन्हा घडला त्यावेळी अल्पवयीन होता. त्यामुळे त्याच्यावर बाल न्यायालयात खटला सुरु आहे. खटल्याचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला होता.

येथील न्यायालयात न्यायाधीश गौड यांच्यासमोर या खटल्याचे कामकाज चालले. सीबीआयतर्फे ॲडव्होकेट मनोज चलदन यांनी कामकाज पाहिले. या खटल्यात एकूण २१ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात हा गुन्हा सिध्द झाला. अप्पर जिल्हाधिकाऱ्याचा थेट जिवंत जाळून खून करण्यात आल्याने या खटल्याच्या निकालाकडे राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागून होते.

हेही वाचा: NMC आयुक्तांकडून मिरवणूक मार्गावर 5 किलोमीटरची रपेट

Web Title: Additional Collector Yashwant Sonwane Murder Case Life Imprisonment To 3 Nashik Crime Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..