अतिरिक्त भूसंपादित जमीन हस्तांतरित करावी : हिरामण खोसकर

Sakal
SakalSakal

घोटी (जि. नाशिक) : वैतरणा धरण (Vaitarna dam) परिसरातील अतिरिक्त भूसंपादित जमीन तातडीने मुळ भोगवटदार शेतकऱ्यांना हस्तांतरित करण्याकरिता मुंबई येथे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची मंगळवारी (ता. २) सायंकाळी आमदार हिरामण खोसकर यांनी भेट घेत नियामक मंडळाने दिलेल्या मान्यतेवर कार्यवाही करण्याची आग्रही मागणी केली. (Additional land acquired in Vaitarna dam area should be transferred said Hiraman Khoskar)


१९७६ मध्ये मुंबईसह इगतपुरी- त्र्यंबकेश्वर परिसरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी वैतरणा धरण बांधण्यात आले. धरण पाणलोटक्षेत्रापैकी उर्वरित अतिरिक्त सहाशे २३ हेक्टर जमिनीवर सरकार लागलेले नाव कमी करण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली दोन वर्षापासून आमदार हिरामण खोसकर यांनी पाठपुरावा सुरु केला होता. त्याची दखल घेत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी वैतरणा लाभक्षेत्रातील अतिरिक्त भूसंपादन जमिनीची पाहणी करून दोनदा मंत्रालय स्तरावर बैठका होऊन नियामक मंडळाचे आदेश जिल्हाधिकारी यांना देणे बाकी होते. यावर पुन्हा आमदार खोसकर यांनी वैतरणा धरण अतिरिक्त जमिनीचा मुद्द्यावर जलसंपदामंत्री यांची भेट घेत शेतकऱ्यांचा रखडलेला प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी विनंती केली. या वेळी नामदार जयंत पाटील यांनी सांगितले, की वैतरणा धरण लाभक्षेत्रातील अतिरिक्त भुसंपादित जमिनीवर मूळ भोगवटदार शेतकऱ्यांचे नाव लावण्यासाठी मागील वर्षीच मंत्रिमंडळ व नियामक मंडळाने मान्यता दिलेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विलंब झाल्याने तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्तावित आदेश सादर करून सदर जमिनीचे रेडीरेकनर दराप्रमाणे मूल्यांकन करून पुढील बैठकीचे नियोजन करावे. हा प्रश्‍न मार्गी लावण्याबाबत कडक सूचना बैठकीत देण्यात देण्यात आल्या आहेत.


वैतरणा धरण लाभक्षेत्रातील अतिरिक्त भूसंपादित मूळ भोगवटदार शेतकऱ्यांना जमीन मिळवून देण्यासाठी दोन वर्षापासून वारंवार पाठपुरवठा सुरु आहे. यासाठी मंत्रालय स्तरावरदेखील चांगले यश येत आहे. शेतकऱ्यांना हमखास न्याय मिळेल यात शंका नाही.
- हिरामण खोसकर, आमदार

Sakal
नाशिक जिल्ह्यात सोशल मीडियावर हनी ट्रॅपचा धोका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com