Employees Strike : कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण; RBHच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती

Employees Strike file photo
Employees Strike file photoesakal

नाशिक : जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सुरू असलेल्या संपामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर काहीसा परिणाम झाला आहे. जिल्हा रुग्णालयातील वर्ग तीन व चार कर्मचारी संपात सामील असल्याने रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

तसेच त्यांची १२ तासांची ड्यूटी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमांतर्गत असलेल्या जिल्ह्यातील सुमारे ३०० कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालयांमध्ये नियुक्त करण्यात आले आहे.

यामुळे जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील आरोग्य सेवा सुरळीत होण्यास मदत होणार आहे. (Additional stress on contractual health workers due to strike Appointment of Contractual Employees of RBH nashik news)

जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेतर्फे बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. रविवारी (ता. १९) संपाला सहा दिवस होऊनही यावर यशस्वी तोडगा निघू न शकल्याने संघटना आक्रमक झाल्या आहेत.

त्याचप्रमाणे, या संपात सार्वजनिक आरोग्य विभागातील वर्ग तीनमधील परिचारिका, फार्मासिस्ट, तंत्रज्ञ, लिपिक तर वर्ग चारमधील कर्मचारी सहभागी झालेले आहेत. यामुळे जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयातील आरोग्याच्या सेवेवर परिणाम झाला आहे.

यासाठी, कंत्राटी कर्मचाऱ्यांवर आरोग्याची भिस्त आली आहे. या कर्मचाऱ्यांना आठ तासांऐवजी १२ तासांची ड्यूटी करावी लागत आहे. मात्र जिल्हा रुग्णालय व जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ आरोग्य कार्यक्रमांतर्गत नेमलेल्या कंत्राटी ३०० कर्मचाऱ्यांनाही जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांमध्ये नेमण्यात आले आहे.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

Employees Strike file photo
Adv Nitin Thakare : मविप्रच्या शाखेला देणार कर्मयोगी जाधव यांचे नाव | ॲड. नितीन ठाकरे

अनुभवी कंत्राटी परिचारिकांची नियुक्ती अतिदक्षता विभागांसह बालविभागात करण्यात आली आहे. त्यामुळे संपावेळी साडेपाचशे ते सहाशे कंत्राटी कर्मचाऱ्यावर कामाचा ताण वाढला होता. यात बालस्वास्थ विभागाचेही ३०० कंत्राटी कर्मचारी समाविष्ट झाल्याने सार्वजनिक आरोग्य यंत्रणेवरील काहीसा ताण कमी झाला आहे.

नोटिसा बजावल्या

संपात सहभागी असलेल्या वर्ग तीन व चारच्या कर्मचाऱ्यांना शासनाच्या आदेशान्वये जिल्हा रुग्णालयामार्फत नोटिसा बजाविण्यात आलेल्या आहेत. यातील काही कर्मचारी हजर झालेले आहेत. परंतु हे प्रमाण अत्यल्प आहे. शासनाच्या आदेशान्वये पुढील कारवाई करण्यात येईल, असे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

"संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांमुळे जिल्हा आरोग्य यंत्रणेवर अतिरिक्त ताण आला आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांसह राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमांतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही जिल्हा आरोग्य यंत्रणेत सामील केल्याने वाढलेला ताण कमी होण्यास मदत होणार आहे."

- डॉ. अनंत पवार, विभागीय आरोग्य अधिकारी, जिल्हा रुग्णालय.

Employees Strike file photo
Antarnad Program : हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताने नटला गोदाघाट!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com