गोळीबार करणार्यांच्या मागावर तीन पथके

गोळीबार करणार्यांच्या मागावर तीन पथके
Published on: 
आडगाव गोळीबार प्रकरण (लोगो) गोळीबार करणाऱ्यांच्या मागावर तीन पथके रवाना सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १९ : आडगाव येथील उड्डाणपुलाखाली दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने एका व्यक्तीवर गावठी कट्ट्यातून दोन राऊंड फायर केल्याचा प्रकार रविवारी (ता. १८) दुपारी घडला होता. गोळीबारानंतर पसार झालेल्या संशयितांच्या मागावर आडगाव पोलिसांची तीन पथके रवाना करण्यात आलेली आहे. याप्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार यांच्या फिर्यादीनुसार, त्यांची पत्नी आणि मुख्य संशयित राहुल सोमनाथ आंबेकर (रा. राजराजेश्वरी मंगल कार्यालयाजवळ, जेल रोड) हे एका खासगी आस्थापनात काम करतात. संशयित आंबेकर हा आपला पाठलाग करत असल्याची तक्रार महिलेने त्यांच्या पतीस दिली होती. या प्रकारामुळे संतापलेल्या महिलेच्या पतीने यांनी काही महिन्यांपूर्वी संशयित आंबेकर याच्या घरी जाऊन कुटुंबासमक्ष त्याला समज दिली होती. या प्रकाराचा राग संशयित आंबेकरच्या मनात होता. याच वैमनस्यातून त्याने रविवारी (ता. १८) दुपारी पावणेदोनला तक्रारदार हे आडगाव टी पाॅइंटजवळील महाराजा हॉटेलकडून खंडेराव महाराज मंदिरमार्गे पुलाखालून दुचाकीने घरी जात असताना संशयितांनी त्यांना अडवले. दुचाकीचालक अज्ञात संशयित तर, त्याच्या मागे बसलेल्या संशयित आंबेकर याने जीवे मारण्याच्या उद्देशाने गावठी कट्टयातून तक्रारदार यांच्या दोन राऊंड फायर केले. सुदैवाने दोन्ही वेळा नेम चुकल्याने तक्रारदार बचावले. तर संशयित पसार झाले. या प्रकरणाचे गांभीर्य पाहता पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हेशाखेचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, परिमंडळ एकच्या उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त शेखर देशमुख, संदीप मिटके, आडगावचे वरिष्ठ निरीक्षक प्रवीण चव्हाण यांनी घटनास्‌थळी भेट देत संशयितांच्या मागावर तीन पथके मुंबईसह जिल्ह्यातील येवला, सिन्नरच्या मार्गावर रवाना करण्यात आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com