Trimbak Devotees
Trimbak Devoteesesakal

Adhik Maas: अधिक-श्रावण आर्थिक उन्नतीचा ऊर्जास्रोत! त्र्यंबकनगरी भाविकांच्या वर्दळीनं रात्रं-दिन जातेय फुलून

Adhik Maas : आधुनिक युगातही त्र्यंबकनगरीच्या पवित्र तीर्थक्षेत्राचं महत्त्व तसूभर कमी न होता, दिवसेंदिवस वाढत चाललंय. देशभरासह परदेशातील भाविकांनी अधिक-श्रावण मासानिमित्त रात्रं-दिन फुलून जात आहे.

भाविकांसह पर्यटकांसाठी निवास, भोजनाप्रमाणे वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध आहेत. पूजा-विधीच्या साहित्याप्रमाणे इतर धार्मिक-आध्यात्मिक बाबींना मागणी वाढल्याने त्र्यंबकराजाच्या नगरीसाठी आर्थिक उन्नतीचा ऊर्जास्रोत मिळाला आहे. (Adhik Maas 2023 Power Source of Shravan Economic Growth trimbakeshwar full of devotees day and night nashik)

ध्यायेन्नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचंद्रा वतंसं

रत्नाकल्पोज्ज्वलाङ्गं परशुमृगवरभीतिहस्तं पर्सन्नम् ।

पद्मासीनं समन्तात्स्तुतममरगणैव्य्राघ्रकृत्तिं वसानं

विश्वाद्यं विश्ववंद्यं निखिलभयहरं पज्चवक्त्रं त्रिनेत्रम् ।।

अर्थात, सुंदर त्रिनेत्र सांभभोळा सदाशिव त्र्यंबकेश्‍वरमध्ये विराजमान आहे. त्याच्या सभोवताली सह्याद्री पर्वतरांग असून, ब्रह्मगिरीला शंकर मानून भाविक पूजा करतात. भगवान शंकरांच्या जटेतून गौतमी गोदावरीची उत्पत्ती झाल्याची नोंद धर्मग्रंथ, पुराणात आहे.

गोदावरी पापाचे हरण करीत असल्याने त्र्यंबक म्हणजे तीन नेत्रांचा ईश्‍वर असे संबोधले जाते. अशा परमेश्वराची ही पवित्र भूमी सर्वत्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळखली जाते.

अशा या तीर्थक्षेत्री बारमाही भाविकांसह पर्यटकांच्या वळणाऱ्या पावलांमुळे व्यवसायात वृद्धी होण्याबरोर रोजगाराच्या संधी खुणावत असतात.

फुलांपासून प्रसादापर्यंत विक्रीत वाढ

पूजा साहित्य, फुले, हार, फळे, पाने, श्रीफळ, पेढे, प्रसादासोबत प्रतिमा, रुद्राक्ष, तुळसी माळा, देव-देवतांसाठीची वस्त्रे, आभूषणे, मूर्ती, उपकरणे यांच्या व्यवसायात वाढ झाली आहे. तीर्थस्नानाबरोबर देवदर्शन, पूजांना भाविकांकडून पसंती मिळत असल्याने अभिषेकांची रेलचेल आहे.

धोंड्याच्या महिन्यामुळे भाविकांची गर्दी वाढली. त्यामुळे स्वाभाविकपणे व्यवसायाच्या दृष्टीने सुगीचे दिवस त्र्यंबकनगरीत अवतरले आहेत. त्र्यंबकराजाच्या मंदिरातील देणगी दर्शनासाठी रांगा वाढत चालल्याने त्याद्वारे उत्पन्नाचा स्रोत तयार झाला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Trimbak Devotees
Adhik Maas 2023 : अधिक मासाचे उरलेत थोडेच दिवस, या पद्धतीने पूजा करून मिळवा पुण्य

कुबेराचा वरदहस्त

त्र्यंबकेश्‍वरचा सखा म्हणून कुबेर अथवा भंडारी. म्हणजे, धनाची देवता मानली जाते. शंकर स्मशानात राहतात अन चिता भस्म लेपण सर्वांगाला लावतात. तो विरक्त आहे.

असे असताना त्याचा सखा कुबेर समवेत असल्याने भाविकांची धनधान्य देण्याची कृपा सांब सदाशिव पूर्ण करतो, अशा भावना भाविकांमध्ये आहेत. त्र्यंबकेश्‍वर क्षेत्रावर कुबेराचा वरदहस्त असल्याचे मानले जाते.

"आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू झाला आहे. तो कार्तिकी पौर्णिमेपर्यंत आहे. या कालावधीत त्र्यंबकेश्वरमध्ये भाविक स्नानासाठी आणि दर्शन-पूजेसाठी गर्दी करतात. शहरात सर्वांना देवाचे मंदिर व तीर्थामुळे रोजगार मिळत आहे. इथे येणाऱ्या प्रत्येकाला पोटाची भ्रांत राहत नाही, ही भावना प्रत्येकात असते. खरेदीनिमित्त येणाऱ्यांशी होणाऱ्या संवादातून हे ऐकायला मिळते." - सुभाष भूतान, किराणा व्यावसायिक

"त्र्यंबकेश्वर क्षेत्रात बाराही महिने धार्मिक वातावरण असते. इथे सतत पूजा-पाठ व मंत्रोच्चार होत असल्याने सर्वांना क्षेत्रात एक पवित्र व धार्मिक ऊर्जा मिळते. त्यामुळे एकवेळेस आलेला भाविक पुन्हा इथे येण्यासाठी आस धरून असतो. हजेरी लावतो. इथे हजारो वर्षांपासून धार्मिक अनुष्ठाने व तप साधना करण्याची परंपरा असून, सदैव आत्मानंद देणारी ही भूमी आहे."

- अरविंद नाकील, स्थानिक पुरोहित

Trimbak Devotees
Adhik Maas 2023 : चांदीच्या वस्तूंच्या घडणावळीवर ‘पीएनजी सन्स’तर्फे विशेष सूट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com