
नाशिक : ‘‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील अडीच कोटी महिलांना दीड हजार रुपयांचे अनुदान दिले जात आहे. या योजनेचा विस्तार करताना लाभार्थी महिलांना बॅक ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून रूपे कार्ड वितरित करण्यात येईल,’’ अशी घोषणा महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी केली.