मस्ट
फोटो ओळी-12147
नाळे : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना आदित्य कृषी एजन्सीजतर्फे स्पोर्ट्स ड्रेस व फराळवाटप करताना उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर, दीपक मालपुरे.
नाळे जि. प. शाळेत
विद्यार्थ्यांना फराळवाटप
मालेगाव शहर, ता. २७ : माळमाथा भागातील चाळीसगाव फाटा येथील आदित्य कृषी एजन्सीजतर्फे नाळे (ता . मालेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दिवाळीनिमित्त स्पोर्ट्स ड्रेस व दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.
उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स ड्रेस व दिवाळी फराळाचे वाटप झाले. आदित्य कृषी एजन्सीजचे संचालक दीपक मालपुरे, शेतकरी संघाचे संचालक सचिन साळुंखे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र वाघ आदी उपस्थित होते.
श्री. सदगीर यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून आदित्य कृषी एजन्सीज सातत्याने ग्रामीण भागातील शाळांमध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांना विविध शालेय साहित्य मोफत देण्यात अग्रेसर आहे.
श्री. मालपुरे म्हणाले, की ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत गोरगरीब मजूर व शेतकऱ्यांची मुले शिक्षण घेतात. त्यांच्या शैक्षणिक विकासासाठी चंबल फर्टीलायझर्स व आदित्य कृषी दोन वर्षांपासून सीएसआर फंडातून शैक्षणिक उपक्रम राबवत आहे. भविष्यात तालुक्यातील चाळीस शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याचे वॉटर फिल्टर देण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे.
मुख्याध्यापिका शीतल बच्छाव यांनी प्रास्ताविक केले. शिक्षक ज्ञानेश्वर पाथरे यांनी सूत्रसंचालन केले.
जिभाऊ कदम, नारायण साळुंखे, दीपक साळुंखे, हिरालाल साळुंखे, एकनाथ लामखडे, गोकुळ कोते, धर्मा कोते, पंकज कदम, मधुकर कोते, समाधान साळुंखे, सुरेश बागूल आदी उपस्थित होते.
............