SNR26B23222
सिन्नर ः सकाळ एनआयईच्या चित्रकला स्पर्धेत राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल आदित्य सरवार याचा गौरव करताना संभाजी जाधव, शुभांगी जाधव, अतुल नीळकंठ.
-----------------
सकाळ एनआयई चित्रकलेत
यशाबद्दल आदित्यचा सत्कार
------------
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता. २२ ः शहा येथील एस. डी. जाधव इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी आदित्य किशोर सरवार याने सकाळ माध्यम समूहाच्या न्यूजपेपर इन एज्युकेश (एनआयई) तर्फे चित्रकला स्पर्धेत यश मिळविले आहे. या स्पर्धेत आदित्यने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवत ४०० रुपये रोख पारितोषिक, तर राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवत एक हजार रुपयांचे रोख पारितोषिक पटकावले.
आदित्यच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष संभाजी जाधव, उपाध्यक्षा शुभांगी जाधव, प्राचार्य अतुल निळकंठ यांच्या हस्ते त्याचा गौरव करण्यात आला. आदित्यचे पालकही उपस्थित होते. मुलाने मिळवलेल्या यशाबद्दल पालकांनी आनंद व्यक्त केला. कलाशिक्षक रोशन सताळे, पूजा पगारे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता आणि कलात्मक कौशल्य विकसित होण्यास मदत होते.
सकाळ एनआयईतर्फे विविध उपक्रम राबविले जात असल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष जाधव यांनी स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी असे उपक्रम महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. शहा येथील जाधव स्कूलमध्ये सर्वांगिण विद्यार्थी घडविण्यावर भर असल्याची माहिती त्यांनी दिली. विद्यार्थ्याच्या यशाचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले.