आमदार सुहास कांदे यांच्यासाठी ‘मातोश्री’चे दरवाजे खुले : आदित्य ठाकरे

aditya thackeray latest marathi news
aditya thackeray latest marathi newsesakal

नाशिक : देशात पुन्हा रामराज्य यावे. सर्वत्र सुजलाम् सुफलाम् वातावरण निर्माण होऊन माणसाचे जगणे अधिक सुकर व्हावे, यासाठी श्रीरामास साकडे घातल्याचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शुक्रवारी (ता. २२) येथे सांगितले. (Aditya Thackeray statement for Suhas kande nashik Maharashtra political news)

गुरुवार (ता. २१)पासून नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास पंचवटीतील श्री काळाराम मंदिर देवस्थानास भेट देऊन श्रीरामाचे दर्शन घेतले.

या वेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख अजय चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, उपनेते सुनील बागूल, माजी आमदार वसंत गिते, माजी महापौर विनायक पांडे यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकारी, युवा शिवसैनिक उपस्थित होते.

श्री. ठाकरे काळारामाच्या दर्शनास येणार असल्याने पोलिसांनी सकाळपासून श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजा येथे बंदोबस्त ठेवला होता. बाराच्या सुमारास श्री. ठाकरे यांचे मंदिराच्या आवारात आगमन झाले. त्या वेळी ‘आदित्य ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

आगमन होताच श्री. ठाकरे यांनी प्रथम दर्शनास पसंती दिली. महंत सुधीर पुजारी, विश्‍वस्त धनंजय पुजारी यांनी त्यांचे स्वागत केले. श्री. ठाकरे यांनी गाभाऱ्यातील आतील सुंदर कोरीव काम न्याहाळले.

दर्शनानंतर मंदिराच्या आवारात माध्यमांच्या प्रतिनिधींनी सुहास कांदे यांच्या भेटीबाबत विचारले असता, याठिकाणी आपण केवळ दर्शनासाठी आलो असून, हे राजकारण करण्याचे ठिकाणी नसल्याचे सांगितले.

आमदार कांदे यांना आपल्याला भेटावयाचे असल्यास त्यांच्यासाठी ‘मातोश्री’चे दरवाजे अद्यापही खुले असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान श्री. ठाकरे यांच्या राममंदिर दर्शनासाठी युवासेनेसह महिला आघाडीच्या पदाधिकारीही उपस्थित होत्या. राममंदिरातून त्यांच्या वाहनाचा ताफा मनमाडकडे रवाना झाला.

aditya thackeray latest marathi news
दोषींवर कारवाई होणार...; जिल्हा शिक्षणाधिकार्‍यांचे चौकशीचे आदेश

राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची भेट

राष्ट्रवादीचे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनानुसार आज माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी शहराध्यक्षा अनिता भामरे राममंदिरात उपस्थित होत्या.

या वेळी त्यांनी आदित्य ठाकरेंची सदिच्छा भेट घेत आम्ही तुमच्याबरोबरच असल्याचे सांगितले. पश्‍चिम विभाग अध्यक्षा योगिता आहेर, पंचवटी विभागाध्यक्ष सरिता पगारे, नाशिक रोड विभागाच्या अध्यक्षा रूपाली पठारे, वनिता कोरडे, संध्या बोराडे, शशिकला जगताप, संगीता पाटील आदी उपस्थित होत्या.

aditya thackeray latest marathi news
Nashik : अर्धवट कामामुळे जागोजागी चिखलाचे साम्राज्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com