Potholes on the main road
Potholes on the main roadesakal

Nashik News: रस्ते दुरुस्तीचा प्रशासनाला विसर; गणेशोत्सव एका दिवसावर अन मुख्य मार्गावर खड्डेच खड्डे

Nashik News : सार्वजनिक गणेशोत्सव अवघा एक दिवसावर आला असून, शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर खड्डेच खड्डे आहेत, तसेच अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली असून, संबंधित प्रशासनाने कोणतेही उपाययोजना केलेल्या नाहीत.

यामुळे नागरिक, मंडळ पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. गणरायाच्या स्वागतासाठी सिन्नरकर वर्षभर आतुरतेने वाट पाहतात. (Administration forgets road repair full of potholes on main road in sinnar eve of ganeshotsav 2023 Nashik News)

सार्वजनिक मंडळासह घरोघरी गणरायाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी झाली आहे. बाजारपेठेसह शहरातील उपनगरातील रस्त्यांवर गणेश मूर्तींची दुकाने थाटली आहेत. शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचा प्रशासनाला विसर पडला आहे.

भैरवनाथ मंदिर ते वाजे विद्यालय, खासदार पूल, लाल चौक, क्षत्रिय देवी मंदिर, सिन्नर बसस्थानक ते वाजे विद्यालयापर्यंत जागोजागी खड्डे पडले आहेत. या रस्त्यांवर पॅचिंग करणे, साफसफाई करणे आवश्यक असताना, संबंधित प्रशासनाने कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Potholes on the main road
Gulbrao Patil: ‘आयुष्यमान भव:’मध्ये जळगाव अग्रेसर ठरेल : पालकमंत्री पाटील

"शहरातील गणेशभक्त सार्वजनिक मंडळाने केलेल्या आरस पाहण्यासाठी येतात. रस्त्यांवरील खड्डे दूर करणे, त्यामधील माती काढणे, खडी टाकून डांबर टाकणे आवश्यक आहे. रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात यावेत." -मनोज भगत, माजी नगरसेवक

"अवघ्या एका दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपलेला असताना, शहरातील खड्डे लवकरात लवकर संबंधित प्रशासनाने बुजवावेत व सिन्नरकरांना सुटकेचा निःश्वास द्यावा."

-अभिषेक गडाख, सामाजिक कार्यकर्ते

Potholes on the main road
Ganeshotsav 2023: मँगोपासून ते काजू केसरमिश्रित मोदक! बाप्पांच्या मोदकांचे 12 हून अधिक प्रकार!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com