Nashik News: शब्दांच्या खेळातच रमले प्रशासन; बोजा कमी करण्याबाबत आदेश, तरीही आयटकबाबत नकारघंटा!

tensed farmer
tensed farmeresakal
Updated on

चांदोरी (जि. नाशिक) : शासनाने माफी देऊन अथवा शेतकऱ्यांनी परतफेड करूनही शेतजमिनीच्या सातबाऱ्यांवरील इतर हक्कात तगाई, बंडिंग, सावकारी यासारख्या कर्जाच्या कालबाह्य़ नोंदी अस्तित्वात असण्याचे राज्यभरातील प्रमाण लक्षणीय आहे.

अशा प्रकारच्या नोंदी निफाड तालुक्यात असून खातेदारांना मात्र ती नोंद कमी करण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याने दिसून येते आहे. (Administration indulged in word games order to reduce burden denial of itak Nashik News)

येथील रहिवासी भगवंत हांडगे हे वडिलांच्या नावावर असलेल्या उताऱ्यावरील आयटक बोजा नोंद रद्द करण्यासाठी किंवा ते कर्ज भरून देण्यासाठी तयार आहेत. नोव्हेंबर २०२१ पासून महसूल अधिकारी व प्रशासकीय यंत्रणेला अर्जफाटे करत आहेत. परंतु शब्दांच्या या खेळात मात्र त्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

तलाठी, मंडलाधिकारी, तहसीलदार, प्रांत, जिल्हाधिकारी आदींकडे पत्रव्यवहार करून देखील समाधान होत नसल्याने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांनी पत्र लिहिले आहे. यातून मार्ग काढण्यासाठी आर्जव केला आहे.

हेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

tensed farmer
Nashik News: सिन्नरच्या पूर्व भागातील वीजपुरवठा सुधारणार!शहा येथे 132 किलोवॉटच्या उपकेंद्राची चाचणी यशस्वी

तहसीलदार शरद घोरपडे यांना दिलेल्या पत्रावर त्यांना मिळालेले लेखी उत्तर असे ः विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या बोजा कमी करण्याबाबत सूचनांचा उल्लेख केलाय परंतु शासन निर्णयात आयटक बोजा माफ करण्यासंदर्भात कोणताही निर्णय आढळून येत नसल्याने बोजा कमी करता येत नसल्याने त्यासंदर्भात जिल्हाधिकारींकडे प्रस्ताव सादर केला आहे.

‘आयटक बोजा नोंद कमी करण्यासंदर्भात कोणताही शासन आदेश नसल्यामुळे शासनाकडे या संदर्भात प्रस्ताव सादर केला आहे असे त्यांनी म्हटले आहे.

"आमच्या ७/१२ वरील आयकट कर्ज विभागीय आयुक्तांच्या पत्रानुसार कमी करायला हवे. नोव्हेंबर २०२१ पासून स्वतः तलाठी, तहसीलदार, प्रांत, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त व मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन आजपर्यंत बोजा कमी झाला नाही. अर्जाचा प्रवास एक वर्षाहून अधिक झाला पण आयकट बोजा कमी झाला नाही. आता अर्ज लोकप्रतिनिधी व सीएमओ, जिल्हाधिकारी यांना परत सादर केला आहे."- भगवंत हांडगे, तक्रारदार.

tensed farmer
Family Planning Surgery : नसबंदीकडे पुरूषांची पाठ! वर्षभरात अवघ्या 5 पुरूषांनी केल्या शस्रक्रिया

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Historic Botanical Discovery: Endemic Orchid Found for the First Time in Maharashtra
Chhatrapati Sambhajinagar
Solapur's Century-Old B-2 Property Issue Ends; Residents to Receive Legal Ownership
Maharashtra Rain
Marathi News Esakal
www.esakal.com