सॅनिटायझर कंपन्यांमध्ये सुरक्षा 'रामभरोसे'; नाशिकमध्ये 'त्या' घटनेच्या पुनरावृत्तीचा धोका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sanitizers

सॅनिटायझर कंपन्यांमध्ये सुरक्षा 'रामभरोसे'; नाशिकमध्ये 'त्या' घटनेच्या पुनरावृत्तीचा धोका

सातपूर (नाशिक) : पुण्यातील सॅनिटायझर बनविणाऱ्या कंपन्यांचे companies manufacture sanitizers) सुरक्षा ऑडिट करून आवश्यक त्या उपाययोजना नसल्यास कारवाई करावी असे आदेश शासनाने दिले असताना संबंधित यंत्रणेने त्याकडे कानाडोळा केल्याचे दिसत आहे. दुसरीकडे कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या (Third Wave of Corona) लाटेचा फायदा घेण्यासाठी अनेकांनी बेकायदा सॅनिटायझरचे उत्पादन सुरू केल्याच चित्र आहे. नाशिक, गोंदेसह सिन्नरमध्येही असे उद्योग सुरू असूनही त्याबाबत दक्षता घेतली जात नाही, त्यामुळे भविष्यात नाशिकमध्येही पुण्याची पुनरावृत्ती झाल्यास झाल्यास नवल वाटायला नको.

सॅनिटायझरचे बेकायदा व उत्पादन करणाऱ्या उद्योगांचा शोध घेत त्यांच्याकडे पायाभूत सुविधा, विशेष करून कामगार सुरक्षिततेचे 'ऑडिट करण्याचे आदेश शासनाने मागील महिन्यात दिले आहेत. मात्र त्याकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष झाले आहे. संभाव्य कोरोना लाटेचा फायदा घेण्यासाठी अनेक जण सरसावले आहेत. सुरक्षा नियम धाब्यावर बसवत उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई कधी होणार हा प्रश्न आहे.

सुरक्षिततेचे नियम धाब्यावर

बेकायदा 'उद्योग' थाटून सॅनिटायझरचे उत्पादन करणाऱ्या अनेक कंपन्यांचा सुळसुळाट असून अशा कंपन्याचा शोधू घेऊन त्यांच्याकडील पायाभूत सुविधा, विशेष करून कामगार सुरक्षिततेचे ‘ऑडिट' करण्याचे आदेश शासनाने मागील महिन्यात दिले होते, मात्र सरकारी यंत्रणांना न जुमानता खबरदारी न घेतलेल्या 'सॅनिटायझर' उत्पादकांना लगाम बसेल. कंपन्यांत जीवघेणे अपघातही घडणार नाहीत अशी आशा राज्य सरकारला होती. सॅनिटायझरची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष पोचून तेथील पाणी पुरवठ्यापासून उत्पादन, त्याचे स्वरूप, क्षमता, कामगार आणि त्यांच्या सुरक्षिततेची साधने, तपासणी पथकांची नेमणूक करण्याचा आदेश उद्योग खात्याने दिला आहे.

नाशिक विभागत १७ कंपन्या

पुण्यात सॅनिटायझरचे उत्पादन करणाऱ्या कंपनीतील आगीच्या घटनेत अठरा जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे उद्योग खातेही खडबडून जागे झाले होते. पुण्यात खासगी जागांत ६६ सॅनिटायझर उत्पादन कंपन्यांची नोदणी करून उद्योग उभारले आहेत. नाशिक विभागात सतरा कंपन्या या नाशिक विभागात नोदणी झाल्या आहेत. या व्यतिरिक्त अनेक बेकायदेशीर कंपन्या थाटल्या आहेत. नोंदणीसह बेकायदेशीर कंपन्यांची तपासणी महापालिका, ग्रामपंचायत आणि अन्य यंत्रणांना तसे अधिकार देऊन कारवाई केली जाणार होती, पण आजपर्यंत नाशिक विभागातील नोंदणीकृत अथवा बेकायदेशीर पणे उद्योग थाटलेल्या एकही कंपनीची अथवा विक्रेत्यांकडे तपासणी करण्यात आली नाही. तपासणी होऊ नये म्हणून बहुतेक कंपन्यांचे वरिष्ठ प्रतिनिधी लॉबिंग करत आसल्याचे बोलते जात आहे.

तपासणी होणे गरजेचे

नाशिक विभागामध्ये १७ कंपन्या असून त्यातील बहुतांश कंपन्या या साखर कारखान्यांसी संबंधित आहेत. काही कंपन्या मद्य बनविणाऱ्या कंपनींशीही संबंधित आहेत. मात्र या यंत्रणांची अजूनपर्यत तपासणी अथवा कुणावर कारवाई झालेली नाही. सुरक्षिततेसंबंधी उपाययोजनांची वेळीच तपासणी झाल्यास पुण्यासारखी दुर्घटना टळू शकते.

टॅग्स :Nashik