RTE Admission : सुरगाणा तालुक्यात आरटीईअंतर्गत प्रवेशास सुरवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RTE Admission

RTE Admission : सुरगाणा तालुक्यात आरटीईअंतर्गत प्रवेशास सुरवात

सुरगाणा (जि. नाशिक) : शासनाने बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अन्वये शासनमान्य कायम अनुदानित व स्वयं अर्थसहाय्यित शाळांमध्ये पहिलीच्या एकूण जागांच्या २५ टक्के जागा वंचित व आर्थिक दुर्बल घटकांसाठी मोफत प्रवेशासाठी राखीव ठेवलेल्या आहेत. (Admission under RTE started in Surgana taluka nashik news)

सदर जागांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सुरवात झाली असून फॉर्म भरण्याची अंतिम मुदत १७ मार्चपर्यंत आहे. सुरगाणा तालुक्यात गिरिजादेवी इंग्लिश स्कूल सुरगाणा ही शाळा 25 टक्के प्रवेशासाठी पात्र असून सात जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहे.

तरी गरजू पालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन गटशिक्षणाधिकारी एल. के. भरसट, शिक्षण विस्तार अधिकारी नरेंद्र कचवे यांनी केले आहे.

प्रवेशासाठी पाल्याचा जन्माचा दाखला, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला तसेच, दिव्यांग असल्यास दाखला आदी कागदपत्रांसह पालकांनी www.rte 25 admission.gov.in या संकेतस्थळावर माहिती भरावी. अधिक माहिती साठी पंचायत समिती सुरगाणा, शिक्षण विभाग येथे संपर्क करावा. असे आवाहन आहे.

टॅग्स :NashikRTEsurgana