धुळे : मुख्य अंकातील पानासाठी....मेन
--
फोटो क्रमांक : 32186
धुळे : राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत होणाऱ्या दोन दिवसीय किशोरी सक्षमीकरण कार्यशाळेच्या उद्घाटनवेळी माहिती फलक अनावरण करताना सीईओ बाबासाहेब बेलदार. शेजारी अंजू उत्पल, अजय फडोळ, डॉ. जाफर तळवी, डॉ. विशाल पाटील, डॉ. तरन्नुम पटेल, डॉ. संजय मोरे, आदी.
--
निरोगी पिढीसाठी किशोरी सक्षमीकरण आवश्यक!
--
सीईओ बेलदार : धुळ्यात दोन दिवसीय किशोरी सक्षमीकरण कार्यशाळेचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १३ : किशोरवय हा केवळ शारीरिक बदलांचा काळ नसून आयुष्याला योग्य दिशा देणारा महत्त्वाचा टप्पा आहे. या काळात मुला- मुलींना मिळणारे मार्गदर्शन, आरोग्याची शास्त्रीय माहिती आणि विश्वासाचे वातावरण यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो. कार्यशाळेत मिळवलेले आरोग्याचे ज्ञान स्वतःपुरते मर्यादित न ठेवता ते शाळा, गाव आणि मित्र- मैत्रिणींपर्यंत पोहोचवून प्रत्येकाने आरोग्यजागृतीचे दूत बनावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार यांनी केले.
राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत येथील हॉटेल गणपती पॅलेसमध्ये होणाऱ्या दोन दिवसीय किशोरी सक्षमीकरण कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. किशोरवयीन मुला- मुलींचे आरोग्य, पोषण, मानसिक स्वास्थ्य, व्यक्तिमत्त्व विकास आणि निर्णयक्षमता विकसित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. राज्यस्तरीय अधिकारी अंजू उत्पल, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजय फडोळ, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. जाफर तळवी, जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे डॉ. विशाल पाटील, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. तरन्नुम पटेल, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय मोरे यांच्यासह अधिकारी व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
-
विविध विषयांवर मार्गदर्शन
दोन दिवस चालणाऱ्या या कार्यशाळेत किशोरवयातील शारीरिक-मानसिक बदल, संतुलित आहार, पोषण, वैयक्तिक स्वच्छता, मानसिक आरोग्य, जीवनशैली व समुपदेशन या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच, उपलब्ध आरोग्यसेवा आणि उपचारांची माहिती देऊन शंकांचे निरसन केले जाईल.
-
१४-१
..चौकट..
१४-१
आदिवासी घटकांवर भर
सीईओ बेलदार म्हणाले, १० ते १९ वर्षे या वयोगटात शरीरात व मनात मोठे बदल होतात. या काळात योग्य उत्तरे न मिळाल्यास गैरसमज पसरू शकतात. जिल्ह्यातील साक्री आणि शिरपूर हे तालुके आदिवासीबहुल असून, तेथे रोजगारासाठी स्थलांतर होते. अशावेळी मुलांच्या शिक्षण व आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून या भागातील मुला- मुलींपर्यंत मार्गदर्शन पोहोचवण्यावर विशेष भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
-