

Educator Vinayak Bachhav Retires After 31 Years of Dedicated Service
Sakal
सटाणा : मुख्याध्यापक विनायक बच्छाव यांनी गेल्या ३१ वर्षांत प्रामाणिकपणे ज्ञानदान करत शाळेला केवळ शैक्षणिक नव्हे, तर संस्कारक्षम दिशा दिली. त्यांच्या कार्यातून अनेक विद्यार्थी घडले, ज्यांनी राज्य व देशसेवेत आपला ठसा उमटवला. शिक्षक म्हणून त्यांची निष्ठा, शिस्त आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली आपुलकी ही भावी पिढीसाठी आदर्श आहे, असे गौरवोद्गार मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी येथे काढले.