‘मार्केट वॉच’ लोगो घ्यावा
---------------------
फोटो - NSK26H34469
मुंबई : सपट डॉ. स्कीन अॅडव्हान्स्ड लोशन स्प्रेच्या अनावरणप्रसंगी डॉ. निखिल जोशी, ऋतू जोशी, सोहन कुंभार, धिरज पवार, शंतनू ढेपले व काशिश चांडक.
सपट ग्लोबल हेल्थतर्फे
अँटिफंगल स्प्रेचे अनावरण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : सपट ग्लोबल हेल्थ प्रा. लि. कंपनीच्या कार्यालयात नवीन ‘सपट डॉ. स्कीन अॅडव्हान्स्ड लोशन स्प्रे’ या उत्पादनाचे अनावरण करण्यात आले. या प्रसंगी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. निखिल जोशी आणि संचालिका ऋतू जोशी तसेच वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बाजारात अनेक वर्षांपासून ग्राहकांचा विश्वास संपादन केलेल्या सपट लोशनच्या परंपरेला पुढे नेत कंपनीने आधुनिक स्वरूपातील अँटिफंगल स्प्रे सादर केला आहे. हा स्प्रे गजकर्ण (रिंगवर्म), बुरशीजन्य खाज, पायांवरील बुरशीजन्य संसर्ग (अॅथलीट्स फूट) आणि जांघेतील बुरशीजन्य संसर्ग (जॉक इच) यांसारख्या त्वचेच्या समस्यांसाठी विकसित करण्यात आला आहे. अभिनेते श्रेयस तळपदे या उत्पादनाच्या जाहिरात मोहिमेशी जोडले गेले असून, ‘अॅडव्हान्स्ड स्प्रे ऑन, खुजली गॉन’ ही या उत्पादनाची संकल्पना आहे. या प्रसंगी उपमहाव्यवस्थापक सोहन कुंभार, साहाय्यक महाव्यवस्थापक धिरज पवार, मार्केटिंग विभागाचे शंतनू ढेपले आणि वित्त विभागाच्या काशिश चांडक उपस्थित होत्या.