Nashik : 36 तासानंतरही वीजकंपनीला सापडेना बिघाड

Fault finding work going on in rains at Sadichhanagar
Fault finding work going on in rains at Sadichhanagar esakal

इंदिरानगर (जि. नाशिक) : सदिच्छानगर भागात गेल्या ३६ तासापासून वीज कंपनीला नेमका काय बिघाड झाला आहे हे सापडू न शकल्याने येथील नागरिकांना तात्पुरत्या वीज पुरवठ्यावर सलग दुसरी रात्र काढण्याची वेळ आली आहे.

या भागातील बाटली कारखाना आणि आसपासच्या परिसरात मंगळवारी (ता. १३) सकाळी वीज गेली. सुरवातीला थोडा वेळात वेळ येईल म्हणून रहिवासी वाट बघत होते. मात्र, तीन-चार तास झाल्यानंतरदेखील वीज न आल्याने मग फोन करणे सुरू झाले. (after 36 hours power company did not find fault nashik Latest Marathi News)

दिवसभर कोणीही इकडे फिरकले नाही. स्थानिक नागरिकांनी येथील माजी नगरसेवकांना फोनद्वारे ही बाब कळवली. मात्र निवडणूक काळात तुम्ही पैसे घेऊन मतदान केले आहे त्यामुळे आम्हाला सांगू नका असे संतापजनक उत्तर दिल्याचे प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्या राधा जाधव यांनी सांगितले. मोठ्या प्रयत्नानंतर सायंकाळी वीज कंपनीचे कर्मचारी येथे आले.

त्यांनी तात्पुरती सोय म्हणून दुसऱ्या डीपीमधून एक उघडी वायर छोट्या फिडरला लावली आणि रात्री वीजपुरवठा सुरू केला. बुधवारी (ता. १४) सकाळी येऊन नेमका काय बिघाड आहे ते शोधून काम करू असे सांगितले. मात्र दिवसभर पुन्हा एकदा कोणीही इकडे फिरकले नाही. सकाळपासून पुन्हा एकदा वीजपुरवठा मात्र खंडित झाला.

मात्र ती वायर रस्त्यात तशीच आडवी पडून होती. जवळपास प्रत्येक घरात छोटी मुले असल्याने येथील रहिवासी घाबरून होते. सायंकाळपर्यंत ना वीज आली, ना दुरुस्तीसाठी लोक आले. त्यामुळे पुन्हा एकदा येथील रहिवाशांनी इकडे तिकडे फोन केल्याने अखेर भरपावसात सायंकाळी सातच्या सुमारास वीज कंपनीचे कर्मचारी आले आणि बिघाड नेमका कुठे झाला आहे हे शोधण्याचे काम सुरू केले.

दिवसा उजेड असताना आणि ऊन असताना आले नाहीत आणि पावसात काम सुरू केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. मात्र, आजदेखील हा बिघाड सापडण्यात या कर्मचाऱ्यांना यश आले नाही. त्यामुळे पुन्हा तात्पुरती व्यवस्था करून आता गुरुवारी (ता. १५) सकाळी बघू असे सांगत निघून गेले.

Fault finding work going on in rains at Sadichhanagar
Dhule : गुंतवणूकदारांची 56 कोटींत फसवणूक; धुळे आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई

शहरात राहतो की पाड्यावर?

उघड्यावर असलेल्या वायरच्या भीतीसह नागरिकांना राहावे लागणार आहे. नाशिक शहरात राहतो की एखाद्या आदिवासी पाड्यावर राहतो, हा प्रश्न नागरिकांना पडला असून या वीज कंपनीच्या कारभाराचे नेमके काय करायचे असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, गणेश विसर्जनाच्या दिवशीदेखील कलानगर चौकाच्या जवळ असलेला नंदनवन रो हाऊसेस परिसरात असणाऱ्या एका डीपीमधून जाळ येत असताना नागरिकांनी वीज कंपनी कार्यालयात संपर्क साधला.

मात्र, त्या वेळीदेखील तब्बल तीन तास कोणीही इकडे फिरकले नव्हते, असा दावा सामाजिक कार्यकर्ते आकाश खोडे यांनी केला होता. दोन दिवसापूर्वीदेखील वनवैभव कॉलनीमध्ये सामाजिक कार्यकर्ते संदीप जगझाप यांच्या म्हणण्यानुसार खांबावर शॉर्टसर्किटमुळे सुरू असलेल्या आगीचा व्हिडिओ आणि फोटो पाठविल्यानंतरदेखील तातडीने याबाबत कार्यवाही झाली नव्हती. एकंदरच सर्वच भागातून वीज कंपनीच्या गलथान कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली जात आहे.

Fault finding work going on in rains at Sadichhanagar
Crime Update : काठेगल्लीत घर फोडून पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com