Jindal Fire Case : जिंदालविरोधातील गुन्ह्यानंतर यंत्रणांची तारेवरची कसरत

विधिमंडळात प्रश्‍न उपस्थित होण्याची शक्यता
Jindal Fire Accidnt
Jindal Fire Accidntesakal

सातपूर (जि. नाशिक) : गोंदे येथील जिंदाल पॉलिफिल्ममधील अग्नीतांडव प्ररकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दौऱ्यानंतर पोलिसांनी व्यवस्थापनावर गुन्हा दाखल केला आहे. सुमारे पन्नास दिवसा नंतर दाखल झालेल्या या गुन्ह्यात आता औद्योगिक सुरक्षा, कामगार सुरक्षा, एमपीसीबी, बाष्पके विभागासह सह इतर तपास यंत्रणाही कामाला लागल्या आहेत.

विधिमंडळाच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता असल्याने सर्व संबंधित यंत्रणांची धावाधाव सुरू आहे. आज रविवार चा दिवस असतानाही याबाबतची माहिती एकत्रित करण्याचे काम विविध विभागात सुरू होते. (After crime against Jindal fire case possibility of questioning of system in legislature nashik news)

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

Jindal Fire Accidnt
Nashik Crime News : जुगार अड्ड्यावर छाप्यात मालेगावला चौघांना अटक

जिंदालमधील आगीच्या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने औद्योगिक सुरक्षेसह एमपीसिबीमार्फत तत्काळ उत्पादन बंद करण्याची कारवाई केली खरी, पण दोन दिवसही होत नाही तोच या विभागाला केंद्र व राज्याच्या मंत्रालयास्तरावरून तपास यंत्रणावर दबाव टाकत झालेली कारवाई माघारी घेत उत्पादन सुरू करण्याची नामुष्की समोर आली आहे.

यामुळे शासनाने कारवाईचा केवळ देखावा करत संबंधितांना वाचवण्याचा आरोप कामगार वर्गासह इगतपुरी, घोटी, गोदे परिसरातील नागरिकांनी केली होता. चौकशी समितीचा अहवाल येण्याआधीच तपास यंत्रणेनेच कंपनीवरील कारवाई मागे घेतल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली.

ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे व विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पाहणीनंतर तपास यंत्रणांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप प्रसारमाध्यमांकडे केला होता, त्यानंतर लगेच गुन्हा दाखल होऊन विविध यंत्रणा जुळवाजुळव करायला लागल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिस यंत्रणांनी गुन्हा दाखल करताच नव्याने अहवाल सादर करण्याची धावपळ उडाल्याचे पाहायला मिळाले आहे.

Jindal Fire Accidnt
Satara Crime News : तोतया पोलिस बनून वृद्धांना लुटण्याचा फंडा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com