Anandacha Shidha : दिवाळी संपूनही 13 गावात मिळेना आनंदाचा शिधा

Anandacha Shidha News
Anandacha Shidha Newsesakal

येवला (जि. नाशिक) : मोठा गाजावाजा करून राज्य सरकारने गोरगरिबांसाठी दिवाळीत स्वस्तात आनंदाचा शिधा वाटप करण्याची घोषणा केली. ही योजना चांगली असल्याने अनेकांनी स्वागतही केले व अनेक सर्वसामान्य कुटुंबाची दिवाळी ही गोड झाली खरी पण राज्यकर्त्याच्या नियोजनाच्या अभावी दिवाळी संपली तरी येवल्यातील तेरा गावात अद्यापही या शिद्यातील तेल मिळालेले नाही. हे तेल नक्की मिळेल असे सांगितले जात आहे. मात्र ऐन दिवाळीत तेलासाठी १५० रुपये अधिक खर्च करण्याची वेळ अनेक सर्वसामान्यांवर आली. (after Diwali 13 villages in yeola not get Anandacha Shidha nashik news)

चांगली योजना असूनही दिवाळी तोंडावर आली तरी शिधा वाटप सुरु न झाल्याने आनंदाचा शिधा वाटपास उशीर झाल्याचे आरोप विरोधी नेत्याकडून झाले होते. त्यानंतर शिधा पॉकिटे आली व त्याचे जोरदार स्वागतही झाले पण पाकिटातील चार वस्तूपैकी गोडतेल गायब झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. दिवाळीच्या अगोदर आनंदाचा शिधा वाटप होऊन सर्वसामान्य व गरिबांची दिवाळी आनंदात जाईल अशी अपेक्षा असताना ऐन दिवाळीच्या दिवशी तालुक्यात आनंदाचा शिधा वाटपाला सुरवात झाली, मात्र वरतूनच आलेल्या या रेशन पाकिटात दुकानातून केवळ तीनच वस्तू दिल्या गेल्या. तेल येईल-येईल असे सर्वजण तेव्हापासून सांगत होते. मात्र दिवाळी झाली तरी १३ गावातील सर्वसामान्याना तेल मिळालेले नाही.

१६-१

शिधा पडला अडीचशेला

तालुक्यातील १३ गावात रवा, साखर आणि चना डाळ या तीनच वस्तू पाकिटातून दिल्या जात असून फोडणीचा तेलाचा पुडा गायब आहे. गोडतेलाचा पुरवठा न झाल्याने रेशन दुकानदारांना डाळ, रवा आणि साखरच द्यावी लागत आहे. यासाठी रेशन दुकानदाराकडून ७५ रुपये आकारले गेले. या १३ गावात ५ हजार ३०० लिटर तेल कमी आलेले नसून त्याबदल्यात २५ रुपये कमी आकारणी झाली आहे. वरच्या पातळीवरून तेल येईल असे सांगितले जात आहे, मात्र अद्याप हे तेल गरजू लाभार्थ्याचा पदरात पडलेले नाही. तेल न मिळाल्याने नागरिकांना आता अंदाजे १४५ ते १५० रुपये पेक्षा अधिक किंमत देऊन बाजारातून गोडतेल विकत घ्यावे लागले. परिणामी नागरिकांना आनंदाचा शिधा २०० ते २२५ रुपयांना पडला आहे.

--------

१६-१ चौकट करणे

वरूनच तेल आलेले नाही...

रेशन दुकानात येणारा प्रत्येक ग्राहक तेलाबाबत अजूनही विचारणा करत आहे. वरूनच तेल आले नसल्याचे प्रत्येक ग्राहकांना समजून सांगताना रेशन दुकानदारांची मात्र नाहक दमछाक होत आहे. काही ठिकाणी रेशन दुकानदारच तेल वाटप करत नसल्याचा आरोप रेशन दुकानदारांवर होत असल्याने, त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. अर्थात येवल्यात तेल नाही तर इतर अनेक ठिकाणीही कुठे डाळ तर कुठे साखर मिळाली नसल्याची चर्चा आहे. एकीकडे शेतकरी अतिवृष्टीच्या नुकसानीमुळे संकटात असून ऐन दिवाळीत त्यांना काहींसा आधार या आनंदाच्या शिद्याने मिळाला आहे, हे नाकारता येणार नाही.

Remarks :

Audit History:Date/Time Description ActionBy

10/29/2022 7:56:50 PM Story received from B-YEOLA

'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com