Nashik News : दिवाळीचा परतीचा प्रवासाला प्रारंभ; लांबपल्याच्या एसटी बसेस फुल्ल

Diwali return journey crowd at the new bus station here.
Diwali return journey crowd at the new bus station here.esakal

Nashik News : दिवाळीचा सण गोड धोड तिखट खाऊन संपला आहे. चाकरमान्यासह शाळकरी बच्चे कंपनीच्या सुट्या संपत आल्याने परतीचा प्रवास सुरू झाला.

विकेंडनंतर आजपासून (ता.२०) ड्यूटीवर जाणाऱ्यांची दोन दिवसांपासून जोरदार लगबग आहे. (after Diwali vacation return journey by bus nashik news)

दिवाळी सणानिमित्त घरी आलेल्या नागरिकांना आता नोकरीच्या गावाला जाण्यासाठी परतीच्या प्रवासाचे वेध लागलेले आहे. मालेगाव येथील बसस्थानकात देखील हेच चित्र असून बसेस प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. यातच लांबपल्याच्या एसटी बसेस फुल होत आहे.

एसटी बसेस फुल्ल असल्याने खासगी बसेसही अव्वाच्या सव्वा भाडे वसूल करत आहेत.खान्देश भागासह कसमादे परिसरातील मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे,सुरत, छत्रपती संभाजीनगर इथं नोकरी निमित्ताने असलेली मंडळी परतीच्या प्रवासाला निघाल्याने या सर्व बसेस फुल्ल आहेत.

Diwali return journey crowd at the new bus station here.
Nashik News: डाळिंबाने सफरचंदाला केले ओव्हरटेक; मालेगावात फळांची रेलचेल

बस स्थानकात प्रत्येक फलाटावर गाडीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठी आहे. बाहेरून येणाऱ्या प्रत्येक बसेस तुडुंब गर्दीने भरलेल्या असल्याने प्रवेश करण्यासाठी प्रवाशांची एकच झुंबड उडालेली दिसत आहे. यात महिला, लहान मुलांचे तर प्रचंड हाल होत आहे.

''दिवाळी सणामुळे बसेसला गर्दी असल्याने प्रवासी बस येताच जागा मिळावी यासाठी एकच गर्दी करताना दिसत आहेत. परतीची गर्दी पाहता नाशिकसाठी जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. पोलिसांचाही बंदोबस्त तैनात असून प्रवाशांची काळजी घेतली जात आहे.दिवाळीचा हंगाम हा एसटीसाठी उत्पन्नाचा ठरत असतो.''- दीपक रामराजे, सहाय्यक आगार व्यवस्थापक

Diwali return journey crowd at the new bus station here.
Nashik News: गटविकास अधिकाऱ्यांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांना नोटिसा; त्र्यंबकेश्वर पंचायत समिती होती कुलूपबंद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com