Latest Marathi News | महामार्गावरील खड्ड्यांवर खडीची मात्रा; ‘सकाळ’च्या वृत्तानंतर काम सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sakal impact

महामार्गावरील खड्ड्यांवर खडीची मात्रा; ‘सकाळ’च्या वृत्तानंतर काम सुरू

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : चाळीसगाव -धुळे रस्त्यावरील तरवाडे बारीपासून ते चाळीसगाव बायपासपर्यंत रस्त्यावरील पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे दररोजच अपघात होत आहेत. या संदर्भात ‘सकाळ’ने शनिवारच्या (ता.२४) अंकात वृत्त प्रसिद्ध करताच राष्ट्रीय प्राधिकरण विभाग खडबडून जागा झाला असून, खडी टाकून खड्डे बुजविले जात आहेत. त्यामुळे वाहनधारकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. मात्र या खड्ड्यांची डागडुजी ही डांबर टाकून करावी, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.(After news of Sakal digging of potholes started Follow up to lay asphalt jalgaon latest news)

हेही वाचा: Jalgaon : अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला लव जिहादच्या संशयावरून मारहाण

चाळीसगाव -धुळे महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे. याबाबत दैनिक ‘सकाळ’ने सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. यापूर्वी मातीमिश्रीत मुरुमने खड्डे बुजविले गेले होते. त्यामुळे पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ झाली होती. पुन्हा ‘सकाळ’ने जागल्याची भूमिका निभावत वास्तव मांडून प्रशासनाला दणका दिला. ‘सकाळ’च्या वृत्ताची तत्काळ दखल घेत राष्ट्रीय प्राधिकरण विभागाने खडी टाकून खड्डे बुजविण्यास सुरवात केली आहे.

मेहुणबारे येथील तीन ते चार किलोमीटर आतंराचा जो पट्टा आहे, त्याचे काम यापूर्वी राज्य महामार्ग विभागाने केले आहे. या सुरू असलेल्या कामामुळे तात्पुरता दिलासा मिळाला आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक वाहने चाळीसगावडे जाण्यासाठी रहिपुरी मार्गाने वाहने वळवतात. चौपदरीकरणाचे काम होईल तेव्हा होईल. मात्र आता या खड्ड्यांमध्ये डांबर टाकून चांगले काम करावे, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा: Eknath khadse : राजकीय विजनवासातून बाहेर काढणाऱ्या शरद पवारांना कसा सोडेन