अतिक्रमणविरोधी पथक अन् व्यावसायिकांत पाठशिवणीचा खेळ

Nashik Gangaghat
Nashik Gangaghatesakal

पंचवटी (जि. नाशिक) : महापालिका आयुक्तांनी (NMC commissioner) मज्जाव केल्याने गेल्या काही दिवसांपासून मोकळा श्‍वास घेत असलेल्या रामसेतूवर व्यावसायिकांनी पुन्हा सुरवात केल्याने अतिक्रमण विरोधी पथक (Anti encroachment department) व व्यावसायिकांत पाठशिवणीचा खेळ सुरू झाल्याचे चित्र आहे. (after nmc anti encroachment drive bussiness started again on ram setu on gangaghat nashik news)

महापालिका आयुक्तांनी रामसेतूवर व्यवसाय करण्यास मज्जाव केल्याने गेल्या महिन्यापासून या पुलाने मोकळा श्‍वास घेतला खरा. परंतु आता पुन्हा व्यावसायिकांनी पुलावर व्यवसाय सुरू करण्यास सुरवात केल्याने हे व्यावसायिक व अतिक्रमण विरोधी पथकात दररोज पाठशिवणीचा खेळ बघावयास मिळत आहे. पुलावर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी जवळपास अर्धा पूल व्यापला होता. याठिकाणी अनेकांनी घरातील पलंग आणून व्यवसायास सुरवात केल्याने पादचाऱ्यांना पुलावरील खड्डे चुकवत मार्गक्रमण करावे लागते. त्यातच केवळ पादचारी मार्ग असलेल्या या पुलावर आता दुचाकीही धावू लागल्याने पादचाऱ्यांना मात्र अतिक्रमणे, खड्डे व वाहने चुकवत चालावे लागते.

Nashik Gangaghat
तलवारीचा छंद बाळगणे आले अंगलट; गुन्हे शाखेने केली तिघांना अटक

डागडुजीबाबत प्रश्‍नचिन्हच

स्वर्गीय भय्यासाहेब पांडे नाशिकचे नगराध्यक्ष असताना शहरातून पंचवटीत जाणे सुलभ व्हावे, म्हणून या पुलाची निर्मिती करण्यात आली. गोदावरीचे असंख्य पूर अनुभवलेल्या या पुलावरील स्लॅब गत महापुरात वाहून गेला. त्यामुळे अगोदरच जीर्ण झालेल्या या पुलाच्या डागडुजीबद्दलही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे, कारण स्मार्ट सिटीने याठिकाणी नव्या पुलाचे नियोजन केल्याने डागडुजी होते की नवीन पुलाची निर्मिती, याविषयी औत्सुक्य आहे. कारण या नव्याने होऊ घातलेल्या पुलाच्या निर्मितीस अनेकांनी विरोध दर्शवत आहे त्याच पुलाची डागडुजी करण्याचा सल्ला स्मार्टच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.

Nashik Gangaghat
Nashik Crime : पत्नीच्या मारेकऱ्याला 5 दिवसांची कोठडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com