नाशिक- आगरटाकळी येथील अवजड वाहनाच्या वाहतुकीमुळे सदर परिसर मृत्यूचा सापळाच बनला आहे. वर्षभरात या परिसरात वाहनाखाली चिरडून नऊ नागरिकांचा मृत्यू झाला. मात्र, तरीही वाहतूक बंद झालेली नाही. त्यामुळे अवजड वाहतूक अजून किती जीव घेणार, असा हा प्रश्न उपस्थित होत आहे. याचबरोबर दत्तमंदिर ते द्वारका हा उड्डाणपूल कधी उभारला जाणार, हा प्रश्नही अनुत्तरीत आहे.