अखेर अगंबाई सुनबाई मालिकेतील कलाकाराने मागितली माफी!

marathi serial
marathi serialesakal
Summary

शिवण मशीनला लाथ मारल्याचे दृश्य दाखवले होते. त्यामुळे टेलर व शिंपी काम करणाऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. त्यामुळे मालिकेच्या लेखक दिग्दर्शकाचा समस्त शिंपी समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला होता.

नाशिक : काही दिवसांपुर्वी झी टिव्ही (Zee TV) वाहिनीवरील 'अग्गंबाई सुनबाई' (Aggabai Sunbai) या मालिकेत (marathi tv serial) एका दृश्याबदद्ल शिंपी समाजातील बांधवानी अक्षेप घेतला होता. याविषयी ईसकाळवर बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर महाराष्ट्रभरात या घटनेबद्दल निषेध व्यक्त करण्यात आला. याचा परिणाम म्हणून सदर मालिकेचा प्रोमो काढण्यात आला असून त्या दिवसाचा पूर्ण भाग देखील हटवण्येणार आहे. तसेच या मालिकेत काम केलेले कलाकर अभिनेते अद्वैत दादरकर (Advait Dadarkar) यांनी सर्व प्रकाराबद्दल व्हिडीओ क्लिप शेयर करत जाहीर माफी मागीतली आहे (aggabai sunbai series actor advait dadarkar apologizes for offensive scene)

गुरुवारी (ता. २०) मे रोजी रात्री ८-३० वाजता झी टिव्हीवर प्रसारित होणारी 'अग्गंबाई सुनबाई' या मालिकेतील नियमितपणे हाेत असलेल्या एपिसोडमध्ये मालिकेत महत्वाची व्यक्तीरेखा साकारत असलेले अभिनेते अद्वैत दादरकर यांनी समस्त शिंपी समाजाचे उपजीवीकेचे साधन असलेल्या व पुजनीय असलेल्या शिवण मशीनला लाथ मारल्याचे दृश्य दाखवले होते. त्यामुळे टेलर व शिंपी काम करणाऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. त्यामुळे मालिकेच्या लेखक दिग्दर्शकाचा समस्त शिंपी समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला होता. तसेच दिग्दर्शक व झी टीव्हीने समस्त शिंपी समाजाची दुरदर्शनच्या माध्यमातूनच जाहीर माफी मागावी अन्यथा आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी मालिकेचे लेखक, दिग्दर्शक व झी. टीव्हीची राहील असा इशारा शिंपी समाजाकडून देण्यात आला होता.

हा प्रसंग दाखवण्यामागे शिंपी समाजाच्या भावना दुखवण्याचा हेतु नव्हता. आम्हा सर्वांना याबद्दल भयंकर वाईट वाटतंय. आम्हाला चित्रिकरण करताना तसं सांगितलं होतं. हेतु जरी तो नसला तरीदेखील मनापासून माफी मागतो. यापुढे असं कुठलंही कृत्य अपच्याकडून घडणार नाही याची काळजी घेऊ असे अभिनेते अद्वैत दादरकर यांनी या व्हिडीओमध्ये सागीतले आहे.

(aggabai sunbai series actor advait dadarkar apologizes for offensive scene)

marathi serial
नाशिक शहरात पुढचे तीन महिने आता ‘नो पार्किंग’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com