नाशिकमध्ये आजान विरोधात पहाटेच्या सुमारास मनसे कार्यकर्त्यांचे आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj thackrey

नाशिकमध्ये आजान विरोधात पहाटेच्या सुमारास मनसे कार्यकर्त्यांचे आंदोलन

नाशिक - आजान विरोधात नाशिकमध्ये देखील पहाटेच्या सुमारास आंदोलन झाले. पहाटे अजान सुरू होताच मनसे कार्यकर्त्यांनी विरोध केला. तातडीने पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेला आदेशानुसार आज बुधवार आहे चार मे रोजी भोग्याच्या विरोधात मनसे कार्यकर्त्यांचे आंदोलन हे नाशिकमध्ये सकाळपासूनच सुरू झाले. पहाटेचा सुमारास दूध बाजार येथील मशिदीमध्ये आजान सुरू होताच मनसे कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक सुजाता डेरे यांनी श्रीरामाच्या घोषणा देत तीव्र विरोध केला पोलिसांना ही घटना की लक्षात आल्यानंतर तातडीने पोलिसांनी सुजाता डेरे यांना आणि त्यांच्यासमवेत असलेल्या इतर कार्यकर्त्यांना अटक केली तर दुसरीकडे जुने नाशिक परिसरामध्ये असलेल्या छप्पराची तालीम याठिकाणी असलेल्या छोट्या मंदिरात अज्ञात व्यक्तीने समोरच्या मशिदीमध्ये सुरू असलेल्या मशिदीत आजान सुरु होताच तातडीने हनुमान चालीसाचा भोंगा लावुन सुरू केला. ही घटना पोलिसांना समजताच तातडीने पोलिसांनी या ठिकाणी असलेला भोगा हा जप्त केला आहे. याठिकाणी अज्ञात व्यक्तींनी हा भोंगा सुरू केला होता त्यामुळे अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिस कारवाई करत आहे . पहाटे दोन वाजल्यापासून नाशिक शहरातील विविध भागांमध्ये पोलिसांनी आपली गस्त सुरू केली ती अतिशय कडक पोलिस बंदोबस्त असताना देखील या घटना घडल्या सातपूर परिसरामध्ये पोलिसांकडून काही भोगे देखील जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

राज्यात बहुतांशी धार्मिकस्थळांना भोंगे वाजविण्याची परवानगी नसल्याने पुण्यात, मुंबईत भोंग्यांच्या परवानग्या दिल्या जात आहेत. मात्र नाशिक शहरात भोंगा वाजविण्यासाठी एकही परवानगी देण्यात आली नाहिये. आजपर्यंत मशिदीमंदिराकडून परवानगीसाठी 60 अर्ज आले आहेत . यापैकी अर्जाची छाननी करण्यात आली असता 39 अर्ज 5 वाजेपासून अजानची परवानगी मागितल्याने बाद करण्यात आलेय. तर काहींच्या बांधकाम महापालिका आणि प्रदूषण परवानग्या नसल्याने त्रुटी पूर्ण करण्यास सांगण्यात आलेय .नाशिक शहरात आज पहाटे एकूण 29 पदाधिकरी कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलये. यात पाच महिलांचा समावेश आहे तर दोन ठिकाणी स्पीकर जप्त करण्यात आलेयत. शहरात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला असून सर्व मस्जिद परिसराला चौकाचौकात तपासणी करण्यात येतेय नाशिक शहरात 100 पेक्षा अधिक कार्यकर्त्यांना 149 च्या नोटिसा तसेच 16 जणांना कलम 144 नुसार तडीपारीच्या नोटिसा राज ठाकरे यांच्या आवाहनाच्या पार्शवभूमीवर नाशिक पोलीस सतर्क झालेयत.

नाशिकमधील भद्रकाली परिसरातील छपरीची तालीम या भागात मनसे कार्यकर्त्यांनी पहाटे भोंगे लावून हनुमान चालीसा पठणाचा (Hanuman Chalisa In Mosque) प्रयत्न केला. सातपूर भागातील मशीदसमोरही असाच भोंगा लावण्यात आला. यावेळी हनुमान चालीसा लावण्यापूर्वीच पोलिसांनी साहित्य जप्त करून मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. शहरातील संवेदनशील मशिदीबाहेर पोलिसांचा पहाटे चार वाजेपासून कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. सकाळपासून शहरातून २९ मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यापैकी काही जणांना तडीपारीच्या नोटिसा देण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Web Title: Agitation Against Ajan Mns Nashik

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top