नंदुरबार जिल्ह्यात ‘ॲग्री-लॉजिस्टिक अँड सर्व्हिस पार्क’ उभारण्याची संधी

नंदुरबार जिल्ह्यात ‘ॲग्री-लॉजिस्टिक अँड सर्व्हिस पार्क’ उभारण्याची संधी
Published on: 
मेन --- NSK26H35132 नंदुरबार : ‘उद्योजक संवाद’ कार्यक्रमास उपस्थित डॉ. गजानन डांगे, संजय अग्रवाल, नगरसेवक व उद्योजक देवेंद्र जैन, डॉ. विक्रांत मोरे, ज्येष्ठ उद्योजक पारसभाई कवाड, मनीष जैन, विलास रघुवंशी, सिद्धार्थ वाणी, शांतिलाल जैन आदी. --- नंदुरबारत ‘ॲग्री-लॉजिस्टिक ॲड सर्व्हिस पार्क’चा निर्धार औद्योगिक विकासासाठी उद्योजक एकवटले, पिकांसाठी बाजारपेठेचा संकल्प सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. १६ : जिल्ह्यात केळी, कापूस, मिरची आणि पपई पिकांसाठी हक्काची बाजारपेठ निर्माण करण्यासाठी नंदुरबारात ‘ॲग्री-लॉजिस्टिक ॲड सर्व्हिस पार्क’ उभारल्यास स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्धार ‘उद्योजक संवाद’ कार्यक्रमात करण्यात आला. ‘योजक’ संस्थेतर्फे शहरातील ‘हॉटेल रिगल’मध्ये आयोजित या कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध उद्योजक उपस्थित होते. ‘नंदुरबार डेव्हलपमेंट समीट’ची तयारी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तीनदिवसीय ‘नंदुरबार डेव्हलपमेंट समीट- २०२६’ आयोजित करण्याचे नियोजन आहे. लोकसहभागातून ‘गुंतवणूक परिषद’ आयोजित करण्याचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याचे डॉ. डांगे यांनी सांगितले. ‘समीट’साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान आणि राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांना निमंत्रण देण्यात आले आहे, असे डॉ. गजानन डांगे यांनी सांगितले. उद्योजक घडविण्याची योजना जिल्ह्यात २०० आदिवासी तरुण उद्योजक घडविण्याचे नियोजन आहे. ‘आरसेटी’च्या माध्यमातून स्थानिक तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देणे, कुशल कामगार उपलब्ध करून देण्यासाठी आठ स्थानिक कंपन्या स्थापन करणे आणि ‘सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट’च्या सहाय्याने स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देणे, असे नियोजन करण्यात येत आहे. धुळे, इंदूर, सुरत, मुंबई आणि नाशिक येथे गुंतवणूकदार परिषदा आयोजित करण्यात येणार आहेत. रोजगाराच्या नव्या संधी जिल्ह्यातील केळी, कापूस, मिरची आणि पपई या पिकांसाठी ‘ॲग्री-लॉजिस्टिक ॲड सर्व्हिस पार्क’ उभारण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्धार करण्यात आला. भरडधान्यांवर प्रक्रिया करून ‘बेबी फूड’ उद्योग विकसित करावेत, तसेच केळीपासून १७ विविध उत्पादने तयार करण्यासाठी नवसारी कृषी विद्यापीठाचे तांत्रिक मार्गदर्शन घेण्याबाबत चर्चा झाली. जिल्ह्यात पाच जिनिंग मिल सुरू आहेत. ४० कोटींपर्यंत गुंतवणूक क्षमता असलेल्या स्थानिक उद्योजकांचा ‘आयडिया शेअरिंग क्लब’ स्थापन करण्याची संकल्पना मांडण्यात आली. --- चौकट भालेर एमआयडीसीच्या समस्यांवर चर्चा उद्योजक संजय अग्रवाल, नगरसेवक व उद्योजक देवेंद्र जैन, डॉ. विक्रांत मोरे, ज्येष्ठ उद्योजक पारसभाई कवाड, मनीष जैन, विलास रघुवंशी, सिद्धार्थ वाणी, शांतिलाल जैन इत्यादी उद्योजकांनी चर्चेत भाग घेतला. एमआयडीसीमधील उपलब्ध भूखंडांची माहिती उद्योजकांना मिळण्यासाठी ‘स्वतंत्र लॅड पोर्टल’ विकसित करण्याचे काम सुरू आहे. भूखंड वाटप प्रक्रियेत दलालांचा हस्तक्षेप वाढत आहे, ही बाब व्यापाऱ्यांनी निदर्शनास आणून दिली. उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी एका स्वतंत्र व्यक्तीची नियुक्त करण्याची सूचना मांडण्यात आली. भालेर एमआयडीसीला बायपास रस्ता उपलब्ध करणे, रेल्वे कनेक्टिव्हिटी निर्माण करणे, एमएसईबी सबस्टेशनचे रखडलेले काम पूर्ण करणे आणि २०२४-२५ व २५-२६ या आर्थिक वर्षांतील प्रलंबित ५० टक्के अनुदान वितरित करणे, या प्रमुख मागण्या व्यापाऱ्यांनी मांडल्या. उद्योगांना चालना देण्यासाठी विविध योजनांना दोन वर्षांची मुदतवाढ देण्याची मागणी झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.