Nashik Krushi Mahotsav : नाशिकमध्ये 10 फेब्रुवारीपासून कृषी महोत्सव! पाच दिवसीय महोत्सवात दोनशेपेक्षा अधिक स्टॉल

विनामूल्य प्रवेश असणाऱ्या कृषी महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम यांनी केले.
Krushi Mahotsav
Krushi Mahotsavesakal

नाशिक : कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ‘आत्मा’ नाशिक व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्यातर्फे १० ते १४ फेब्रुवारी यादरम्यान डोंगरे वसतिगृह मैदानावर कृषी महोत्सव होणार आहे.

विनामूल्य प्रवेश असणाऱ्या कृषी महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम यांनी केले. (Agricultural festival in Nashik from February 10 More than two hundred stalls in five day festival nashik news)

पाच दिवसांच्या कृषी महोत्सवात दोनशेपेक्षा अधिक स्टॉल असणार आहेत.

यात कृषी विभाग व इतर संलग्न विभागाच्या शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी शासकीय दालने, शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्री, सेंद्रिय शेतमाल विक्री, आधुनिक शेती औजारांचे प्रदर्शन तसेच गट, शेतकरी उत्पादक कंपनी, बचतगट यांच्यामार्फत उत्पादित केलेले प्रक्रियायुक्त पदार्थ विक्रीसाठी स्टॉल उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

Krushi Mahotsav
Police Sport Competition : नाशिकमध्ये राज्यस्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धा; रविवारपासून प्रारंभ

महाराष्ट्र ग्रामीण खाद्यसंस्कृती दर्शविणारे विक्रीचे स्टॉलही प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाच्या अनुषंगाने विविध विषयांवर परिसंवादही कृषी महोत्सवात असणार आहे.

यासोबतच जिल्ह्यातील शेतीमध्ये उत्कृष्ट काम करणारे शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषी विस्तारक, कृषी क्षेत्रातील नवीन उद्योजक यांनाही महोत्सवात पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे, असेही प्रकल्प संचालक श्री. निकम यांनी कळविले आहे.

Krushi Mahotsav
Sanjay Raut : यापूर्वी छापे पडले, त्याचे काय झाले? नाशिकच्या छापेसत्रावरून राऊत यांचा केंद्राला टोला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com