esakal | कृषी उत्पन्न बाजार समितीत उलाढाल ठप्प; बंदचा बळीराजाला मोठा फटका
sakal

बोलून बातमी शोधा

market committee

कृषी उत्पन्न बाजार समितीत उलाढाल ठप्प; बंदचा बळीराजाला मोठा फटका

sakal_logo
By
दत्ता जाधव

पंचवटी (जि.नाशिक) : कोरोनाचा फटका (corona virus) सर्वच आस्थापनांना कमी-अधिक प्रमाणात बसला आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती (nashik market committee) व तिच्या उपबाजारांत रोज सरासरी साडेचार ते पाच कोटी रुपयांची उलाढाल होते. मात्र गत सहा दिवसांपासून समितीचे कामकाज बंद असल्याने तीस कोटी रुपयांची ( उलाढाल ठप्प झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. (Agricultural Market Committee closed due lockdown)

कामकाज ठप्प

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील दिंडोरी रोडवरील समितीत फळभाज्या, पालेभाज्या व अन्य शेतमालाचा लिलाव, तर कांदे, बटाटे, लसूण व अन्य मालाचा व्यवहार पेठ रोडवरील शरदचंद्र बाजार समितीत होतो. याशिवाय समितीचे त्र्यंबकेश्‍वर, पेठ, हरसूलसह नाशिक रोड येथे उपबाजार आहे. मुख्य बाजार समितीसह उपबाजार समिती आवारात रोज सरासरी साडेचार ते पाच कोटी रुपयांची उलाढाल होते. परंतु प्रशासनाने १२ मार्चला दुपारपासून कडकडीत बंदचे धोरण स्वीकारल्याने मुख्य समितीसह उपबाजार समिती आवारातील कामकाज ठप्प झाले आहे. याचा फटका समितीसह बळीराजालाही बसला आहे.

हेही वाचा: तौक्ते चक्रीवादळाचा दणका; जिल्ह्यात २७८ घरे अन्‌ ८०० हेक्टरचे नुकसान

अनेकांवर उपासमारीची वेळ

कोरोनाची चेन ब्रेक होण्यासाठी प्रशासनाने १२ तारखेपासून येत्या ३१ तारखेपर्यंत काही अपवाद वगळता सर्वत्र क्षेत्रात कडकडीत बंदची अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे नाशिकच्या मुख्य बाजार समितीसह उपबाजारांतील सर्वच व्यवहार थंडावल्याने समितीत कार्यरत हमाल, मापारी, चवली दलालांसह लहान-मोठ्या व्यावसायिक यांच्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे.

हेही वाचा: दिलासादायक! शहरात कोरोना रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर

बळीराजाचे मोठे नुकसान

कृषी उप्तन्न बाजार समितीत रोज सकाळ, सायंकाळ लिलाव होतात. यातून नाशिकसह दिंडोरी, निफाड, त्र्यंबकेश्‍वर, गिरणारे आदी भागातून पालेभाज्या, फळभाज्यांची मोठ्या प्रमाणावर आवक होऊन रोज कोट्यवधींची उलाढाल होत असल्याने बाजार समिती शेतकऱ्यांची प्रमुख अर्थवाहिनी ठरली आहे. मात्र गत पाच-सहा दिवसांपासून समितीच्या प्रवेशद्वारच बंद झाल्याने, तसेच शेतमाल नाशवंत असल्याने मिळेल त्याठिकाणी व त्यादराने विक्री करावी लागते. त्यातच एकीकडे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. दुसरीकडे समितीही बंद असल्याने अस्मानी अन् सुलतानी अशा दोन्ही आघाड्यांवर शेतकऱ्यांना लढा द्यावा लागत असल्याचे चित्र आहे.

गत १२ तारखेपासून मुख्य बाजार समितीसह उपबाजारातील व्यवहार ठप्प झाले आहेत. याठिकाणी रोज सरासरी साडेचार ते पाच कोटी रुपयांची उलाढाल होते. त्यामुळे गत सहा दिवसांत तब्बल ३० कोटींची उलाढाल थंडावली आहे. -अरुण काळे, सचिव, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती

loading image
go to top