Market Committee Election : इच्छुकांचे निवडणुकीसाठी आखाडे बांधायला सुरवात; 30 एप्रिलला मतदान

Market Committee Election
Market Committee Electionesakal

नाशिक : आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या व दीड हजार कोटींची उलाढाल असणाऱ्या बाजार समितीची सत्तेची चावी आपल्या हातात राहण्यासाठी मुरब्बी नेतेमंडळी यांनी होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आपली कंबर कसली आहे. (Agricultural Produce Market Committee Quinquennial Election election process will be conducted between March 27 and April 30 nashik news)

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली, त्यानंतर इच्छुकांनी आखाडे बांधायला सुरवात केली असून २७ मार्च ते ३० एप्रिल दरम्यान निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.

लासलगाव बाजार समितीची मुदत १० मे २०२१ ला संपली होती त्याला राज्य सरकारकडून एक वर्षाची मुदतवाढ दिली होती व त्यानंतर आजपर्यंत प्रशासक सविता शेळके कार्यभार बघत आहे. या पंचवार्षिक निवडणुकीत मागील काळात विरोधी असलेले जयदत्त होळकर व नानासाहेब पाटील गट एकत्र निवडणूक लढवणार असून त्यांना पंढरीनाथ थोरे व डी. के. जगताप गट आव्हान उभे करू शकतील.

गट, पॅनलसाठी प्रयत्न

या पंचवार्षिक निवडणुकीत दोन पॅनल निर्माण होऊन त्यात चुरशीची लढत होईल पॅनल निर्मितीसाठी छगन भुजबळ, डॉ. भारती पवार, दिलीप बनकर, अनिल कदम यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. या निवडणुकीसाठी जयदत्त होळकर, नानासाहेब पाटील, कल्याणराव पाटील, बाळासाहेब क्षीरसागर यांचा एक गट तर पंढरीनाथ थोरे, डी. के. जगताप, राजेंद्र डोखळे यांचा एक गट तयार होऊन पॅनल निर्मिती होऊ शकते.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

Market Committee Election
MBA CET Exam : सर्व्हर बंद पडल्याने परीक्षा केंद्रावर गोंधळ; परीक्षा पुन्हा घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी

छगन भुजबळ यांनी जयदत्त होळकर व डी. के. जगताप यांनी एकत्र येऊन पॅनल तयार करावे यासाठी येवला येथे प्राथमिक चर्चा केली पण त्याला यश आले नाही. या निवडणुकीमध्ये मागील पंचवार्षिक निवडणुकीत आमदार कल्याणराव पाटील यावेळी मात्र होळकर पाटील गटाला आपले वजन देणार आहे.

२७ मार्च ते ३ एप्रिल दरम्यान नामनिर्देशन करण्यात येणार आहे. ५ एप्रिलला छाननी करण्यात येईल. ६ एप्रिलला वैध नामनिर्देशन यादी प्रसिद्ध केली जाईल. ६ एप्रिल ते २० एप्रिल माघारी घेता येईल. २१ एप्रिलला उमेदवाराची अंतिम यादी व त्यानंतर ३० एप्रिलला मतदान व त्या दिवशी रात्री मतमोजणी होणार असून निकाल जाहीर करण्यात येईल.

इच्छुकांची गर्दी

या निवडणुकीसाठी जयदत्त होळकर, पंढरीनाथ थोरे, बाळासाहेब क्षीरसागर, राजेंद्र डोखळे, डी. के. जगताप, शिवनाथ जाधव, सुवर्णा जगताप, सुभाष कराड, बबन सानप, शिवाजी ढेपले, भीमराज काळे, राजेंद्र बोरगुडे, भास्कर पानगव्हाणे, शिवा सुराशे, अशोक गवळी, गोकुळ पाटील, मोतीराम मोगल, गणेश डोमाडे,

Market Committee Election
Nashik News : गुंतवणुकीच्या आमिषाने अनेकांना गंडविले

बाळासाहेब दराडे, अशोक गवळी, डॉ. श्रीकांत आवारे, रमेश पालवे, संजय वाकचौरे, नंदकुमार डागा, ओमप्रकाश राका, प्रकाश दायमा, ओम चोथानी, सचिन ब्रम्हेचा, डी. के. गांगुर्डे, प्रवीण कदम, सोमनाथ शिरसाट, योगेश गोलाईत, अजय सोनी, ॲड. उत्तम नागरे, विशाल पालवे, रामनाथ शेजवळ, ललित दरेकर, बबन शिंदे, पूजा दरेकर या निवडणुकीत इच्छुक आहेत.

१८ जागांवर चुरस

बाजार समितीच्या एकूण १८ जागेसाठी मतदान होणार असून सोसायटी गटातून ११ सदस्यांपैकी सात जनरल जागा व दोन महिला प्रतिनिधी तर ग्रामपंचायत गटातून चार जागेसाठी दोन जनरल, एक एससी/एसटी, व एक आर्थिक दुर्बल गट.

तर व्यापारी गटासाठी दोन जागा तर हमाल मापारी साठी एक जागा असे १८ सदस्यांसाठी निवडणूक होणार आहे. सोसायटी गटासाठी ७७९ मतदार, ग्रामपंचायत गटासाठी ५७५ मतदार, व्यापारी गटात ५४२ मतदार, तर हमाल मापारी गटात ३९७ मतदार आपल्या हक्क बजावणार आहेत

Market Committee Election
Nashik News: बनकर यांनी निर्माण केलेल्या सहा सोसायट्यांना स्थगिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com