Nashik : लाच घेताना कृषी अधिकाऱ्यास अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 अटक
लाच घेताना कृषी अधिकाऱ्यास अटक

लाच घेताना कृषी अधिकाऱ्यास अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कृषी विक्री केंद्राच्या परवान्याचे नूतनीकरण करून देण्यासाठी केंद्र चालकाकडून पाच हजारांची लाच घेताना पेठ तालुका कृषी अधिकारी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. अरविंद पगारे (रा. जगताप मळा, नाशिक रोड) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. करंजाळी (ता. पेठ) येथील एका कृषी केंद्राचे शेतीपयोगी, बी बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशकांचा स्टॉक योग्य असल्याचे दाखविणे, तसेच कृषी केंद्राच्या परवाना नूतनीकरणासाठी अडचण येऊ नये म्हणून पगारे यांनी तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. बुधवारी (ता. २४) पंचासमक्ष ही रक्कम स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यास अटक केली.

loading image
go to top